जत्रेचा प्रातिनिधिक फोटो (सौजन्य - Canva)
मुंबई, 20 ऑक्टोबर : दिवाळी आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जत्रा सुरू होतात. तुम्हीही अशा जत्रांना जात असाल तर सावध राहा. एका जत्रेतील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या जत्रेत एक भयंकर दुर्घटना घडली आहे. नागरिकांच्या जीवाशी अक्षऱशः खेळ केला जातो आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. असं या जत्रेत नेमकं काय घडलं ते पाहा.
जत्रा म्हटली की त्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे पाळणे पाहायला मिळतात. या पाळण्यांमध्ये बसण्याचं मोह लहान मुलंच नव्हे तर मोठ्या माणसांनाही आवरत नाही. या झुल्याचा आनंद तसा प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. मोठ्या माणसांमधील लहान मूल जागं होतं आणि या पाळण्यांमध्ये मजा लुटली जाते. पण आकर्षक दिसणारे, मजेशीर वाटणारे हे पाळणेच धोकादायक, अगदी जीवघेणेही ठरतात.
हे वाचा - Shocking! अचानक तुटला Break dance Jhula, हवेत उडाले लोक; भयंकर दुर्घटनेचा VIDEO
आता या व्हिडीओतच तुम्ही पाहा बोटीसारखा दिसणारा हा पाळणा. घड्याळातील लंबक किंवा दोलकाप्रमाणे इकडून तिकडे हलतो आहे. यावर बरेच लोक उभे आहेत. अगदी एखादी गाडी भरावी तसा हा पाळणार खचाखच भरला आहे. बसायला जागा नाही म्हणून बरेच लोक उभे राहिले आहेत. एकमेकांना धरून, तर काही एकमेकांवरही उभे आहेत. हे दृश्य पाहूनच हे काय, असा प्रश्न आपल्याल पडतो आणि तितक्यात…
जत्रेतील आनंदी वातावरण काही क्षणात तणावचं बनतं. जी भीती आपल्याला हा व्हिडीओ पाहताना वाटते, ती भीती खरी ठरते. जसा झोपाळा वेग धरतो तसे या खचाखच भरलेल्या झुल्यावरून काही लोक धडाधड जमिनीवर कोसळतात.
हे वाचा - जत्रेत जाणं जीवावर बेतलं, राईड करताना झाला भयंकर अपघात, पाहा थरारक व्हिडीओ
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. साहजिकच क्षमतेपेक्षा जास्त लोक या झुल्यात बसवले त्यामुळे ही दुर्घटना घडली हे या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसून येतं.
एकंदरच जास्त पैसे कमावण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं दिसतं. त्यामुळे तुम्ही जत्रेत जात असाल तर अशा क्षमतेपेक्षा जास्त लोक असलेल्या झुल्यावर बसण्याची चूक चुकूनही करू नका.