JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर बसून वाघाने मारली डरकाळी, गाडीतील लोकांची झाली अशी अवस्था; पाहा VIDEO

रस्त्यावर बसून वाघाने मारली डरकाळी, गाडीतील लोकांची झाली अशी अवस्था; पाहा VIDEO

या रस्त्यावर वर्दळ कमी असली तरी गाड्या येत जात असतात. अचानक गाडीसमोर वाघ आल्यानं लोकही घाबरली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिवनी, 14 जुलै : सोशल मीडियावर वाघ आणि सिंहाचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. यात काही शिकारीचे व्हिडीओ असतात, तर रस्त्यावर बिनधास्त फिरत असलेल्या वाघांचेही असतात. असाच एक पेंच नॅशनल पार्क (Pench National Park) मधल्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अचानक रस्त्यावर वाघ आल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर हा वाघ चक्क रस्त्याच्या मधोमध येऊन बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पेंच नॅशनल पार्कच्या बफर झोनमधील एनएच -7 चा सांगितला जात आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यापासून सुमारे 25 कि.मी. अंतरावर असलेल्या पेंच नॅशनल पार्कच्या बफर झोनमधील एन.एच.-7 वर रस्त्याचे काम सुरू आहे. या परिसरात कायम वाघ फिरत असतो. याच रस्त्यावर हा वाघ येऊन बसला होता. रस्त्यावर वर्दळ कमी असली तरी गाड्या येत जात असतात. अचानक गाडीसमोर वाघ आल्यानं लोकही घाबरली. गाडीसमोर डरकाळी मारल्यानंतर हा वाघ जंगलाकडे निघाला. वाचा- तरुणानं हात लावताच काढला फुत्कार, चिडलेल्या सापानं काय केलं पाहा VIDEO

संबंधित बातम्या

वाचा- भारतात दिसला गोल्डन टायगर, सर्वात दुर्मीळ असलेल्या वाघिणीचे PHOTO VIRAL येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी हा व्हि़डीओ आपल्या कॅमेरात कैद केले. यानंतर वनविभागालाही कळविण्यात आले आणि पोलिसांची टीमही घटनास्थळी पोहोचली. पेंच नॅशनल पार्क जवळचा परिसर असल्यामुळे येथे अनेकदा वाघ रस्त्यावर येतात. यामुळे वाघांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सिवनी ते नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर 9 किलोमीटरचे बांधकाम केले जात आहे, जेणेकरून वाघ एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी जाऊ शकतील. वाचा- शिकारीसाठी दबा धरून बसलाय सिंह, शोधा बघू तुम्हाला तरी सापडतोय का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या