हरियाणा, 28 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं लोकांना आणखी काही काळ घरात कैद रहावं लागणार आहे. 60 वर्षांवरील वृद्धांना आणि लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळं त्यांना विशेष काळजी घेण्यास सांगितली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी पोलीस मात्र दिवसरात्र काम करत आहेत. सध्या सोशल मीडियावर सेवेसाठी आणि मदतीचा हात देण्यासाठी तत्पर असलेल्या या पोलिसांचा असाच एक भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हरियाणातील पंचकुला जिल्ह्याचा आहे. येथील पोलिसांनी एका निवृत्त ऑफिसरचा वाढदिवस लॉकडाऊनमध्ये साजरा केला.
वाचा- कोरोना शेल्टरमध्ये पडले प्रेमात, 30 दिवसात झालं शुभमंगल सावधान लॉकडाऊनमध्ये एकटे राहणारे ऑफिसर करण पुरी यांचा वाढदिवस खास करण्यासाठी पोलिसांनी केकही आणला होता. त्यांच्या बिल्डिंगखाली पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग राखत त्यांचा वाढदिवस साजरा केला. कमिशनर ऑफ पंचकुला यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांना हातात केक घेतलेला पाहून करण पुरी यांना अश्रू अनावर झाले. डोळ्यातील आनंदाश्रूसह करण पूरी यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. वाचा- लॉकडाऊनमध्ये पत्नीच्या आठवणीत ढसाढसा रडायला लागले 94 वर्षांचे आजोबा
वाचा- काम करता करता पोलिसांनी सुरु केला डान्स, कोरोना योद्ध्यांचा VIDEO VIRAL
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंतकुल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.