कराची 28 जून: असं म्हटलं जातं, की प्रेमाला (Love) कशाचंही बंधन नसतं. प्रेमात जात-धर्म आणि अगदी सीमाही ओलांडल्या जातात. असं एक प्रकरण आता पाकिस्तानातून समोर आलं आहे. पाकिस्तानातील एका तरुणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pakistani Girl Appeals To PM Narendra Modi) यांच्याकडे अशी मागणी केली आहे, की तिला भारताचा व्हिसा (Visa) दिला जावा, जेणेकरून ती भारतात येऊन आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधू शकेल. या तरुणीचा बॉयफ्रेंड भारतीय नागरिक आहे. एकाची चूक सर्वांनाच पडली महागात; सायकल रेसमधील भयंकर दुर्घटनेचा Video Viral टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या कराची येथे राहाणाऱ्या सुमन रंतीलाल हिला दीड वर्षापूर्वी भारतातील रहिवासी असलेल्या अमितवर प्रेम झालं. हे दोघंही तेव्हापासूनच प्रेमाच्या बंधनात बांधले गेले आहेत. याच कारणामुळे सुमननं बॉर्डर क्रॉस करण्यासाठी मोदी सरकारकडे विशेष परवानगी मागितली आहे. सुमन एक शिक्षिका आहे. ती सध्या MPhil करत आहे. सुमननं पाकिस्तानात असलेल्या भारतीय उच्चायोगात (Indian High Commission) आपल्या ट्रॅव्हल व्हिसासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा केली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रकोपामुळे तिला व्हिसा मिळालेला नाही. PHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक सुमनचा बॉयफ्रेंड पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याच्या श्री हरगोबिंदपुर येथे राहातो. साल 2019 मध्ये सुमन आणि अमित फेसबुकद्वारे भेटले होते. यानंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि आता या दोघांनाही लग्नगाठ बांधायची आहे. 2020 पासूनच कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे सुमनला भारतात प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत.