दोन जननेंद्रियांसह जन्मलं बाळ
कराची, 1 मे : काही व्यक्ती सामान्य शरीरासह जन्माला येतात तर काहींना जन्मत:च एखादा अवयव जास्त किंवा कमी असतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसतो. पाकिस्तानमध्ये अशीच एक दुर्मिळ वैद्यकीय घटना समोर आली आहे. या नवजात मुलाला जन्मत: दोन कार्यरत पेनिस (जननेंद्रियं) होते. शिवाय त्याला गुद्द्वारही नव्हतं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये लिहिताना, संशोधकांच्या एका टीमनं नमूद केलं की, या स्थितीला वैद्यकीयदृष्ट्या डिफॅलिया म्हणतात. सहा दशलक्ष लोकांपैकी एखाद्या व्यक्तीला या दुर्मिळ परिस्थितीचा सामना करावा लागतो. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती पूर्ण किंवा अपूर्ण डिफॅलिया म्हणून प्रकट होऊ शकते. याची बहुतेक प्रकरणं कॉम्प्लेक्स युरॉलॉजिकल, गॅस्ट्रोइंटेस्टीनल किंवा एनोरेक्टल विकृतीशी संबंधित असतात. रिसर्च अॅब्स्ट्रॅक्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, दुर्मिळ स्थितीसह जन्मलेल्या पाकिस्तानमधील मुलाचं एक लिंग सामान्य-आकाराचं होतं तर दुसऱ्याचा आकार पहिल्या लिंगाच्या आकारापेक्षा 1 सेमीनं मोठा होता. रिसर्चमध्ये नमूद केल्याप्रमाणं, “त्याला दोन वेगळ्या मूत्रमार्गांच्या छिद्रांसह डिफॅलिया होता. दोन्ही लिंग अनसर्कमसाईज होते. एका लिंगाची लांबी 2.5 सेमी होती तर दुसऱ्या लिंगाची लांबी 1.5 सेमी होती. दोन्ही लिंगांमध्ये सामान्य जागी असलेल्या मूत्रमार्गाच्या छिद्रांसह सामान्य आकाराच्या कांड्या होत्या. त्याच्याकडे दोन मिडलाइन रेफी आणि एकच अंडकोष होता. त्याला दोन्ही छिद्रातून लघवी करता येत होती. त्याच्या युरॉलॉजिकल सिस्टिमच्या अल्ट्रासोनोग्राफीमध्ये दोन मूत्रमार्ग आणि एक हेमी मूत्राशय निदर्शनास आलं. त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि सिग्मॉइड-डिव्हाईडेड कोलोस्टोमी करण्यात आली. डॉक्टरांनी कोलोनोस्कोपीद्वारे ओपनिंग तयार केलं जेणेकरून बाळाला पोटातील मल बाहेर टाकता येईल.” डिफॅलिया ही एक दुर्मिळ जन्मजात विसंगती आहे. याचा अर्थ दोन संरचनात्मक आणि शारीरिकदृष्ट्या वेगळी लिंग असणं. रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, या केसमधील रुग्णाला एनोरेक्टल विकृतीसह डिफॅलिया होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सिग्मॉइड कोलोस्टोमी तयार करण्यात आली. वाचा - ही लाल रंगाची भाजी कमी करते वाढलेली साखर! ‘या’ पद्धतीने खाणं योग्य शारदा हॉस्पिटलमधील डॉ. श्रेय श्रीवास्तव, एमडी (इंटर्नल मेडिसिन), यांनी सांगितलं की, डिफॅलियाला पेनाइल डुप्लिकेशन (पीडी), डिफॅलिक टेराटा किंवा डिफॅलास्पारॅटस असंदेखील म्हणतात. ही स्थिती का उद्भवते त्याचं कारण अज्ञात आहे. “डिफॅलियाशी संबंधित विसंगती मोठ्या प्रमाणात बदलत असल्यानं, त्याच्या कारणाचं एक साधं, एकल स्पष्टीकरण देणं अशक्य आहे. पण, गर्भावस्थेच्या तिसऱ्या आणि सहाव्या आठवड्यादरम्यान, गर्भाच्या सुरुवातीच्या विकासाच्या अवस्थेत क्लोकल मेम्ब्रेनच्या डुप्लिकेशनपासून याची सुरुवात होत असावी,” असं डॉ. श्रीवास्तव यांनी indianexpress.com ला सांगितले. व्हाइटफील्ड बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलमधील युरॉलॉजीचे सल्लागार डॉ. श्रीनिवास आर. पी. यांनी या विकृतीच्या सखोल मूल्यमापनावर भर दिला. ते म्हणाले, “डबल पेनिस असल्यानं दुहेरी मूत्रमार्ग, युरेथ्रा, मूत्राशय आणि पचनसंस्थेशी संबंधित अनेक विसंगती निर्माण होतात. त्याचा संबंध डायलेटेड कोलनशी असल्यानं त्याचं मूल्यांकन आणि एक्साइज करणं आवश्यक आहे.” डॉ. श्रीनिवास यांनी असंही आवाहन केलं की, डबल पेनिसची ही कंडिशन पालक आणि सर्वसामान्यांना भयावह वाटू शकते. पण, जोपर्यंत जन्मलेलं मूल लघवी करू शकतं तोपर्यंत घाबरून जाण्याची गरज नाही. रिसर्चमध्ये नमूद केलं आहे की, अशा प्रकरणांचं व्यवस्थापन रोगाच्या स्पेक्ट्रमनुसार केलं पाहिजे. याबाबत सहमती दर्शवत डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय आणि नैतिक कारणं विचारात घेऊन केसनुसार उपचार सुरू केले जातात. दोन्हीपैकी कार्यरत नसलेल्या पेनिसची शस्त्रक्रिया केली जाते. बाळाचं वजन थोडं वाढलं आणि काही महिन्यांनंतर ते अधिक स्थिर झालं की, कोणता मूत्रमार्ग काढून टाकणं आवश्यक आहे हे निर्धारित करण्यासाठी डॉक्टर सखोल मूल्यांकन करू शकतात. वाचा - चाळिशीनंतर महिलांच्या आहारात असायलाच हवे हे 6 पोषक घटक! वाचा फायदे “कोणतं मूत्राशय काढलं पाहिजे हेदेखील आपण ठरवू शकतो. कारण, दोन मूत्राशयं दीर्घकाळासाठी व्यवस्थित काम करू शकत नाहीत. म्हणून, दोन्ही किडनी सामान्य मूत्राशयाशी जोडल्या जाव्यात यासाठी एक मूत्राशय आणि एक मूत्र मार्ग काढून टाकणं आवश्यक आहे. यामुळे मूत्र मार्ग त्याच्या नियमित स्थितीत रिस्टोर होईल. या व्यतिरिक्त, लहान किंवा कमी विकसित पेनिसदेखील काढून टाकलं पाहिजे,” असं डॉ. श्रीनिवास म्हणाले. वरील प्रकरणात, बाळाची पोस्ट-ऑपरेटिव्ह रिकव्हरी सामान्य असल्यानं त्याला शस्त्रक्रियेनंतरच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. नंतर, त्याला फॉलोअपसाठी बोलावण्यात आलं आहे, अशी माहितीही या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.