कोईम्बतूर 29 ऑगस्ट : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे ऑनलाई जेवण मागवतात. यामुळे लोकांना कुठेही न जाता, घरबसल्या कोणत्याही वेळी जेवण मागवता येतं. यासाठी सध्या भारतात झोमॅटो आणि स्विगी प्रसिद्ध आहे. यावर लोकांना चांगला डिस्काउंट आणि ऑफर मिळते. म्हणून तर मोठ्याप्रमाणात लोक या ऍप्सवरुन जेवण मागवतात. परंतु फूड डिलिव्हरी कंपनी swiggy ने एक मोठा घोळ घातला आहे. खरंतर एका व्यक्तीने ट्वीटरवर Condom फोटो शेअर केला, ज्यानंतर या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. या व्यक्तीने ड्यूरेक्स कंडोमचा फोटो शेअर करत ट्वीटरवर माहिती लिहिली की, “मी माझ्या मुलांसाठी चिप्स आणि आईस्क्रिम मागवलं होतं, पण मला हे मिळालं @swiggy” कोईम्बतूरच्या एका व्यक्तीने swiggy वर आपल्या मुलांसाठी आईस्क्रीम आणि चिप्स मागवले पण त्याऐवजी त्याला कंडोम मिळाले. ज्यानंतर या रागावलेल्या व्यक्तीने 27 ऑगस्ट रोजी ट्विटरवर आपली तक्रार शेअर केली, ज्यामध्ये swiggy ला देखील टॅग केलं गेलं होतं. हे वाचा : तिने एक सेल्फी घेतली आणि सहा लोकांचा जीव गेला… वाचा काय आहे हे प्रकरण परंतु नंतर हे ट्वीट हटवलं गेलं, परंतु एका दुसऱ्या वापरत्याकर्त्याने याचा स्क्रिनशॉट पुन्हा ट्वीटरवरती शेअर केला आहे.
ही घटना ज्या व्यक्तीसोबत घडली, त्या व्यक्तीचं नाव पेरियासामी आहे. रिपोर्टनुसार swiggy ने त्याची समस्या सोडवली आहे. परंतू असं असलं तरी आता swiggy कंपनीवर प्रश्न उपस्थीत केले जाऊ लागलेआहेत. हे वाचा : अचानक सोशल मीडियावर #burgerpizze का होऊ लागलं ट्रेंड, याचा भारत-पाकिस्तान मॅचशी काय आहे संबंध? हा प्रकार फार गंभीर असून फूड डिलीवरी ऍपवरून चक्क कंडोमची विक्री केली जातं आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत.