JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम क्रॅश केलं स्वतःचं विमान; मात्र उडी घेताना घडलं असं काही की.., धक्कादायक VIDEO

प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम क्रॅश केलं स्वतःचं विमान; मात्र उडी घेताना घडलं असं काही की.., धक्कादायक VIDEO

अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघाचा माजी स्नोबोर्डर जॅकबने नोव्हेंबर २०२१ मध्ये सांगितलं की, उड्डाण करत असताना त्याच्या विमानाला अचानक अपघात झाला. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा दावा त्याने केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 एप्रिल : लोकप्रिय होण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? यासाठी तो आपला जीव धोक्यात घालेल का? कदाचित याचं उत्तर नाही असं आहे. मात्र, जगात वेड्या लोकांची कमतरता नाही. अनेकदा सुशिक्षित हुशार लोक अशी काही कृत्ये करतात, जी पाहून प्रश्न पडतो की हे लोक खरंच आपल्या डोक्याचा वापर करत असतील का? माजी ऑलिंपियन ट्रेव्हर जॅकब देखील यातीलच एक व्यक्ती आहे. ज्याने ना आपल्या नावाची पर्वा केली, ना आपल्या जीवाची. फक्त जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने आपला जीव धोक्यात टाकला. जॅकबला आपल्या यूट्यूब चॅनलसाठी एक खास व्हिडिओ (YouTube Video) बनवायचा होता, पण या नादात त्याने असं काही केलं ज्याचा त्याला नंतर आयुष्यभर पश्चाताप होईल. व्हिडिओ बनवण्यासाठी त्याने ते विमान क्रॅश (Plane Crash) केलं, जे तो स्वतः चालवत होता. ‘अग्नी खेळी’दरम्यान एकमेकांवर जळत्या मशाली फेकताना दिसले लोक; भयानक VIDEO, नेमका काय आहे प्रकार? अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघाचा माजी स्नोबोर्डर जॅकबने नोव्हेंबर २०२१ मध्ये सांगितलं की, उड्डाण करत असताना त्याच्या विमानाला अचानक अपघात झाला. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा दावा त्याने केला. पण विमान अपघाताचा तपास करणाऱ्या टीमने त्याच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश केल्यावर त्याचं पितळ उघडं पडलं. प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की, इंजिनमध्ये बिघाड होण्याच्या घटनेपूर्वीच त्याने पॅराशूट घातलं होतं. यातून हे स्‍पष्‍ट झालं की, सगळं काही अगोदर विचार करून ठरवलं गेलं आणि यानंतर ही दुर्घटना नीट पार पाडली गेली. हे अत्यंत चुकीचं होतं. डिसेंबर 2021 मध्ये जॅकबने त्याच्या YouTube चॅनलवर ‘मी माझे विमान क्रॅश केलं’ या कॅप्शनसह एक व्हिडिओ अपलोड केला तेव्हा या घटनेची पुष्टी झाली. त्यानंतर त्याला यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) उड्डाण करण्यास बंदी घातली.

त्याचा हा घाणेरडा खेळ सर्वांना समजला. पहिली गोष्ट म्हणजे इंजिनमध्ये बिघाड होण्याआधीच जॅकबने पॅराशूट घेतलं, दुसरं म्हणजे विमानाला योग्य लँडिंग साइटवर सुरक्षितपणे उतरवण्याइतकी उंची असूनही, विमान लँड करण्यासाठी काहीही प्रयत्न न करता, तो त्यातून बाहेर पडला. जॅकब सेफ दुर्घटनेनंतर कॅलिफोर्नियाच्या लॉस पॅड्रेस नॅशनल फॉरेस्टमध्ये पोहोचला. यानंतर त्याने स्टंट रेकॉर्ड करण्यासाठी वापरलेले सर्व कॅमेरे काढून टाकले आणि नंतर दाट जंगलातून परत ट्रेक सुरू केलं. शेवटी एका स्थानिक शेतकऱ्याने त्याची मदत केली. ‘रण’रागिणीला सॅल्युट! अंगाची लाही लाही होत असतानाही बेशुद्ध वृद्धेला घेतलं पाठीवर; रणरणत्या वाळवंटात जीव वाचवण्यासाठी धडपड सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जॅकबने ते विमान अपघाताच्या एक महिना आधी विकत घेतलं होतं. अचानक झालेल्या अपघातात त्याला जेवढी आरामदायक जागा, वेळ आणि सुरक्षितता मिळाली तेवढी क्वचितच कुणाला मिळाली असेल. त्याच्या सुरक्षित नियोजनामुळेच त्याचा खेळ उघड झाला. मात्र, त्याचा व्हिडिओ ज्या उद्देशाने बनवण्यात आला तो उद्देश पूर्ण झाला. म्हणजेच त्याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. मात्र, आता आयुष्यभर त्याला विमान उडवता येणार नाही, कारण त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या