JOIN US
मराठी बातम्या / Viral / वयाचं शतक ठोकताच पोलिसांनी घेतली महिलेची 'विकेट'; 100 व्या वाढदिवशीच आजीबाईंना अटक कारण..

वयाचं शतक ठोकताच पोलिसांनी घेतली महिलेची 'विकेट'; 100 व्या वाढदिवशीच आजीबाईंना अटक कारण..

महिला आपला 100 वा वाढदिवस साजरा करत असताना पोलीस आले आणि तिला अटक केलं.

जाहिरात

वयाचं शतक गाठताच महिलेला अटक. (फोटो सौजन्य - व्हिक्टोरिया पोलीस फेसबुक)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 25 ऑगस्ट : आपण शंभर वर्ष जगावं असं कुणाला वाटत नाही. वयाचं शतक गाठणारे लोक क्वचितच आहे. अशाच एक आजी ज्या आपला 100 वा बर्थ डे साजरा करत होत्या. पण वाढदिवशीच त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बर्थडेला आजीबाईंना पोलिसांनी अटक केली. वयाची शंभरी गाठणाऱ्या या आजीबाई अटकेमुळेही चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या अटकेमागील कारणही विचित्र आहे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असतो तो म्हणजे आपल्या वाढदिवस. त्यातही जर हा वाढदिवस 100 वा असेल तर तो आणखीनच खास असतो. वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर तिचं कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि इतर लोकांनाही त्याचं कौतुक वाटतं. पण वयाचं शतक गाठल्यानंतर त्याच दिवशी तुमच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या तर कसं वाटेल. फक्त वाचूनच हैराण झालात ना. पण ऑस्ट्रेलियातील जीन बिकेटन यांच्यासोबत हे प्रत्यक्षात घडलं. व्हिक्टोरियातील राहणाऱ्या जीन आपल्या घरात काही खास मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील लोकांसोबत आपला बर्थडे सेलिब्रेट करत होत्या. त्याचवेळी पोलीस तिथं आले आणि त्यांनी त्यांना अटक केली. हे वाचा -  Love story : शेजारी बसली आणि बनली गर्लफ्रेंड; कपलची ‘बसवाली लव्ह स्टोरी’ चर्चेत व्हिक्टोरिया पोलिसांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंट वर ही पोस्ट करण्यात आली आहे. या महिलेचा फोटोही शेअर केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन पोलीस गार्डन्स रेजिंडेशिअलमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या घरी गेले. तिच्या हातात हळूच बेड्या घातल्या आणि तिला अटक केल्याचं घोषित केलं. आता या वयात या आजींनी काय गुन्हा केला असेल, वाढदिवशीच त्यांना अटक का केली? असे एक ना दोन कित्येक प्रश्न तुम्हाला पडले असलीत. या महिलेने असं काहीच केलं नाही. खरंतर आपण अटक व्हावं अशी या महिलेचीच इच्छा होती. वयाच्या 100 वर्षांत तिला कधीच अटक झाली नाही आणि ती पोलिसांकडेही गेली नाही. त्यामुळे तिला अटक होण्याची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न तिच्या कुटुंबाने केला. त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि तिला अटक करायला लावलं. हे वाचा -  डेंजरस इश्क! परीक्षेत फेल झाली Girlfriend; Boyfriend ने रागात उचललं धक्कादायक पाऊल जेव्हा ही महिला वाढदिवस सेलिब्रेट करत होती तेव्हाच तिला अटक झाली आणि थोड्या वेळाने तिला सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर सर्वांनी मिळून आनंदात बर्थडे साजरा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या