JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News : नोकरी नाही, घरी बसून कंटाळला, व्यक्तीनं केलं असं काही की पोलिसही चक्रावले

Viral News : नोकरी नाही, घरी बसून कंटाळला, व्यक्तीनं केलं असं काही की पोलिसही चक्रावले

लोक घरी रिकामे बसून त्यांच्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि काही लोक विचित्र गोष्टी करतात. नुकतंच एक प्रकरण चर्चेत आलं होतं ज्यामध्ये एका व्यक्तीला नोकरी मिळत नव्हती.

जाहिरात

व्यक्तीनं केलं असं काही की पोलिसही चक्रावले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जुलै : जगभरात बेरोजगारी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण घेऊनही अनेकजणांना नोकरी नाहीय. या समस्येतून अनेकांनी आत्महत्येसारखे धोकादायक पाऊस उचलले आहे. अशातच लोक घरी रिकामे बसून त्यांच्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि काही लोक विचित्र गोष्टी करतात. नुकतंच एक प्रकरण चर्चेत आलं होतं ज्यामध्ये एका व्यक्तीला नोकरी मिळत नव्हती. मात्र त्याने जे काही केलं ते वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. एक नोकरी नसलेला व्यक्ती घरी बसून काहीही विचार करु शकतो. एका बेरोजगार व्यक्तीनं काम नसल्यानं ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याचा वेश घेतला. खरी नोकरी न करता त्यानं घेतलेल्या या वेशाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

रशियाचा 48 वर्षीय व्हिक्टर स्टॅव्ह्रोपोल भागात राहतो. या वयातही तो बेरोजगार असल्यानं घरी बसून कंटाळा यायचा. वाहतूक पोलिसात भरती होण्याची त्यांची खूप इच्छा होती, परंतु वाहतूक पोलीस विभागात त्यांची नियुक्ती व्हावी, अशी परिस्थिती नव्हती. यामुळे त्यानं एक युक्ती लढवली. असा जुगाड केला की याविषयी कोणी विचारही करणार नाही. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटनं याविषयी वृत्त दिलं आहे. Viral Video : पाण्यात घुसून जग्वारने मगरीवर केला हल्ला, पुढे घडलं असं की… व्हिक्टरने ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश विकत घेतला आणि पियातिगोर्स्की प्यातिगोर्स्की नावाच्या गावात कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून स्वत:ची नियुक्ती केली. तो गणवेश घालून रस्त्यावर फिरायचा आणि आपले अप्रतिम कौशल्य, आत्मविश्वास आणि कपडे वापरून लोकांना व्यवस्थित गाडी चालवण्याचा धडा शिकवायचा. जो कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत होता, व्हिक्टर त्याला थांबवून सुधारायचा. पण त्याचे खोटं फार काळ टिकलं नाही. 2 महिन्यात त्याचं हे सत्य उघड झालं आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या