JOIN US
मराठी बातम्या / Viral / Nepal Plane Crash : 72 जणांसह विमान कोसळतानाच पहिला थरारक VIDEO समोर, 45 मृतदेह सापडले

Nepal Plane Crash : 72 जणांसह विमान कोसळतानाच पहिला थरारक VIDEO समोर, 45 मृतदेह सापडले

रविवारी नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. आता या भीषण विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काठमांडू 15 जानेवारी : रविवारी नेपाळ मधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. या घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. सध्या विमानतळ बंद आहे. यति एअरलाइन्सचं ATR-72 विमान पोखराजवळ अपघातग्रस्त झाल्याने विमानात प्रवास करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. आतापर्यंत 45 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं समोर येत आहे. आता या भीषण विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान कोसळलं; 72 प्रवाशांमध्ये 4 भारतीयांचाही समावेश, आतापर्यंत 40 मृतदेह सापडले विमान कोसळतानाचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये जमिनीपासून काही अंतरावर असलेलं हे विमान अचानक कोसळताना दिसतं. या घटनेनंतर विमानाला आग लागली, ही आग विझवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

आतापर्यंत विमानातील 45 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानामध्ये एकूण 72 लोक प्रवास करत होते. यातील 68 प्रवासी होते, यात 4 भारतीयांचाही समावेश होता.

प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितलं की, जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

विमानाने काठमांडूहून पोखरा येथे ६८ प्रवाशांसह उड्डाण केलं होतं. विमान सुमारे 20 मिनिटांनंतर क्रॅश झालं, यावेळी ते त्याच्या गंतव्यस्थानापासून काही किलोमीटर दूर होतं. बचावकार्य अद्याप सुरू आहे. अपघातग्रस्त विमानाला आग लागली असून बचाव कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या