JOIN US
मराठी बातम्या / Viral / किचनपासून ते लडाखपर्यंत नवरात्रीचा जल्लोष, एका क्लिकवर पाहा हे हटके VIDEO

किचनपासून ते लडाखपर्यंत नवरात्रीचा जल्लोष, एका क्लिकवर पाहा हे हटके VIDEO

देशाच्या विविध भागातून गरबा, दांडियााचे हे सोशल मीडियावरील व्हिडीओ लोकांना वेड लावत आहेत.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई 27 सप्टेंबर :**नवरात्रीला सोमवारपासून सुरूवात झाली आहे आणि नवरात्री म्हटलं की सहाजिकच गरबा आणि दांडिया हे आपल्याला आपोआपच सुचतात. अनेक लोक नवरात्रीमध्ये दांडिया आणि गरब्याचे कार्यक्रम आणि स्पर्धा ठेवतात. ज्यामध्ये हौशी लोक आवर्जून सहभाग घेतात. सोशल मीडियावर देखील यासंबंधीत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. त्यांपैकी असे काही व्हिडीओ आहेत, जे सोशल मीडियावर लोकांनी उचलून धरले आहे. लोक अगदी कुठेही गरबा खेळू लागले आहेत. ते ही आपल्या वेगळ्याच अंदाजात. ज्याला लोकांनी देखील पसंती दर्शवली आहे. त्यांपैकी काही व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे पाहून तुमचं देखील मनोरंजन होईल. देशाच्या विविध भागातून गरबा, दांडियााचे हे सोशल मीडियावरील व्हिडीओ लोकांना वेड लावत आहेत. हे वाचा : लागली पैज? असा गरबा तुम्ही कधीच पाहिला नसेल, आगळ्या-वेगळ्या Video ने वेधलं सगळ्यांचं लक्ष

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

यामध्ये शून्यापेक्षा कमी तापमानात लडाखमध्ये लोक नाचत असलेला व्हिडीओ आहे. तसेच लहान मुलापासून, स्वयंपाकघरात काम करतानाच्या दांडियाचा सुद्धा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या