मुंबई, 18 जुलै: रेल्वे ट्रॅकवरुन क्रॉस करणे धोक्याचे असते. याबाबत वारंवार नागरिकांना आवाहन केलं जातं. मात्र तरीही नियम मोडून लोक बेसावधपणे रेल्वे ट्रॅक क्रॉस करतात. अनेकांना यामध्ये जीवही गमवावा लागतो. कल्याण रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन येथील वयोवृ्द्ध व्यक्ती रेल्वे लाईन क्राॅस करताना इंजिनच्या खाली आली. त्यावेळेस रेल्वे चालकाने आपात्कालिन ब्रेक दाबून प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. (Mumbai-Varanasi train brake hard to save senior citizen crossing tracks at Kalyan station) हे ही वाचा- Video :…आणि रेल्वे ट्रॅकवर धावू लागली कार; हा प्रताप पाहून प्रवासीही हैराण
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या ट्रेनसमोर हा प्रकार घडला. यावेळी या ट्रेनचे लोको पायलट एस के प्रधान आणि सहाय्यक एल पी रवी शंकर यांनी ट्रेनचे आपात्कालिन ब्रेक दाबून वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडू रेल्वे क्राॅस करणे जीवावर बेतू शकते असे वारंवार सांगितलं जाते. मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. दरम्यान या वेळेत रेल्वे थांबवल्यामुळे वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ट्रेनच्या खाली वृद्ध व्यक्ती आली होती, मात्र ट्रेन वेळेवर थांबली आणि रेल्वे चालक व लोको पायलटने त्यांना बाहेर काढले. यानंतर अनेक लोक तेथे जमा झाले होते.