JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोलिसाची 'सिंघम' गिरी, ड्यूटी सोडून करत आहे खतरनाक स्टंट

VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोलिसाची 'सिंघम' गिरी, ड्यूटी सोडून करत आहे खतरनाक स्टंट

कोरोना वॉरिअर ड्यूटी सोडून करतोय सिंघम स्टाइल स्टंट, अजय देवगणला लाजवेल असा VIDEO सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दमोह (मध्य प्रदेश), 11 मे : एकीकडे कोरोनाच्या युद्धात सर्व देश एकत्र आला आहे. पोलीस कर्मचारी, नर्स, डॉक्टरसारखे कोरोना वॉरियर्स सध्या दिवसरात्र एकूण करून लोकांची सेवा करत आहे. देशात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले. यात काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे कर काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अशा सगळ्या परिस्थितीत एक पोलीस अधिकारी मात्र स्टंटबाजी करताना दिसत आहेत. मध्य प्रदेशातील दमोह येथील उप-निरिक्षक मनोज यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंघम स्टाइल स्टंट करताना मनोज यादव दिसत आहे. दोन गाड्यांवर उभे राहून खाकी वर्दीत मनोज यादव सिंघम गाणं गात आहेत. दरम्यान हा व्हिडीओ एडिट केलेला आहे की त्यांनी स्वत: तयार केला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही आहे. तसेच काहींच्या मते हा व्हिडीओ जुना असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. वाचा- ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं

संबंधित बातम्या

वाचा- कोरोनामुळे मनं जुळली! घटस्फोट घेतलेल्या सुनेची सासुने केली मनधरणी आणि… मात्र ड्युटी सोडून असे व्हिडीओ तयार करणाऱ्या कोरोना वॉरियर्सवर कारवाई करण्याची मागणीही काहींनी केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याआधीही मनोज यादव यांनी पोलीस वर्दीत असे व्हिडीओ केले होते. वाचा- कामावरून काढलं म्हणून कर्मचाऱ्यानं केला बॉसच्या 5 कोटींच्या गाडीचा चुराडा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या