JOIN US
मराठी बातम्या / Viral / डोंगरावर फिरायला गेलेल्या व्यक्तीचा पाठलाग करू लागला सिंह अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

डोंगरावर फिरायला गेलेल्या व्यक्तीचा पाठलाग करू लागला सिंह अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लॉस एंजेलिसच्या डोंगराळ भागात एकटाच फिरायला गेलेला दिसतो. तो आपल्या ट्रेकिंगचा व्हिडीओ बनवत असताना अचानक कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल्याचं त्याला जाणवलं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 जानेवारी : अॅडवेंचरची आवड असलेले लोक अनेकदा दुर्गम आणि डोंगराळ भागात फिरण्यासाठी एकटेच जातात. ही ठिकाणे खूप सुंदर असली तरी अशा ठिकाणी एकट्याने जाणं मोठ्या धोक्यापेक्षा कमी नाही. याचंच उदाहरण नुकतंच एका व्हिडिओच्या (Shocking Video Viral) माध्यमातून पाहायला मिळालं. यात दिसतं की डोंगराळ भागात एक व्यक्ती एकटाच चालला होता, इतक्यात एका सिंहाने त्याचा पाठलाग सुरू केला (Lion Started Following a Man). बाबो! या अंड्याला सोशल मीडियावर तब्बल 55 दशलक्ष Likes; इतकं का आहे खास पाहा हे वाचून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. निर्जन प्रदेश आणि त्यातही पाठलाग करणारा सिंह (Lion Following a Man). या परिस्थितीत कोणाचीही घाबरगुंडी उडू शकते. नुकतंच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. व्हायरल हॉगने नुकतंच आपल्या यूट्यूबवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये हे अतिशय धक्कादायक दृश्य पाहायला मिळतं.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लॉस एंजेलिसच्या डोंगराळ भागात एकटाच फिरायला गेलेला दिसतो. तो आपल्या ट्रेकिंगचा व्हिडीओ बनवत असताना अचानक कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल्याचं त्याला जाणवलं. यानंतर त्याने कॅमेरा फिरवला पण त्याला आधी काहीच दिसेना. त्याने नीट निरखून पाहिल्यावर एक सिंह (Lion Attack Man viral video) त्याच्याकडे पाहताना दिसला. पुढे अचानक झुडपातून सिंह बाहेर येतो आणि हल्ला करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे धावतो.

रेस्टॉरंटमध्ये घुसला चवताळलेला रेडा आणि…; अंगावर काटा आणणारा थरारक LIVE VIDEO

हे दृश्य पाहून हा व्यक्ती घाबरतो. मात्र, कठीण परिस्थितीतही तो आपल्या डोक्याचा वापर करतो. सिंह जवळ येऊ लागताच हा व्यक्ती संपूर्ण ताकदीने जोरात ओरडतो आणि यानंतर सिंह तिथून धूम ठोकतो. हे दृश्य खरंच हैराण करणारं आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी या व्यक्तीच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या