JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking : मुलीला एकटं सोडून आई गेली 10 दिवसांच्या सुट्टीवर, झाला भयानक शेवट

Shocking : मुलीला एकटं सोडून आई गेली 10 दिवसांच्या सुट्टीवर, झाला भयानक शेवट

आईच्या आणि मुलाच्या प्रेम, काळजी दाखवणाऱ्या अशा अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र एखादी आई क्रूर, निर्दयी असून शकते या विचारानेच अंगावर काटा येतो.

जाहिरात

मुलीला एकटं सोडून आई गेली 10 दिवसांच्या सुट्टीवर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जून : जगात आईला देवासमान मानलं जातं. ती आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जिला टेन्शन असूनही चेहऱ्यावर स्मितहास्य करत राहते. तिच्यासोबत कितीही भांडण केलं तरीही आपली साथ कधीच सोडून जात नाही. आईच्या आणि मुलाच्या प्रेम, काळजी दाखवणाऱ्या अशा अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र एखादी आई क्रूर, निर्दयी असून शकते या विचारानेच अंगावर काटा येतो. आजकाल तर अशाही घटना समोर येत आहेत जिथे आई आपल्याच मुलांसोबत विचित्र कृत्य करते. यामध्ये आणखी भर पडली असून एक आई चक्क आपल्या 16 महिन्यांच्या मुलीला घरात एकटं सोडून फिरायला गेली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका आईने आपल्या 16 महिन्यांच्या मुलीला घरी एकटी सोडले आणि स्वतःच सुट्टीवर गेली. अमेरिकेतील हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलं आहे. अनेक लोक या घटनेवर संताप व्यक्त करत आहे.

कॅंडेलॅरिओने तिची लहान मुलगी जेलीनला, काही तासांसाठी नाही तर 10 दिवसांसाठी एकटं सोडलं आणि स्वतः सुट्टीवर गेली. कोणाच्याही देखरेखीशिवाय तिनं चिमुकलीला एकटं सोडलं. क्रिस्टल 10 दिवसांच्या सुट्टीवर पोर्तो रिको आणि डेट्रॉईटला गेली होती. कॅंडेलरियोने शेजाऱ्यांना तिच्या मुलीची काळजी घेण्यास सांगितले. मात्र, 10 दिवसांत त्यांनी पुन्हा तिची विचारपूर करायला किंवा काही हवं नको ते बघायला एकही कॉल किंवा मेसेज केला नाही. अखेर चिमुकलीचा जीव गेला. Viral News : प्रियकरानं उरकलं गुपचूप लग्न, चिडलेल्या प्रेयसीने केलं भयानक कृत्य क्लीव्हलँड पोलीस विभागाचे अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना 16 जून रोजी माहिती मिळाली की मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस जेलिनच्या घरी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली, तिने स्वत:ला मुलाची आई सांगितलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे एका आईने आपल्या 16 महिन्यांच्या मुलीला घरात एकटी कशी सोडली, तीही कोणत्याही देखरेखीशिवाय? 16 जून रोजी पोलीस जेलीनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगी मृत दिसली. पोलिसांनी चौकशीदरम्यान सांगितले की जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगी एका घाणेरड्या ब्लँकेटवर पडलेली दिसली, ज्यावर लघवी आणि शीचे डाग होते. या प्रकरणी पोलिसांनी आई क्रिस्टेल कँडेलेरिओविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या