JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : आई मोबाईलमध्ये इतकी बिझी झाली की मुल कुठे ठेवलं तेच विसरली, व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल

Viral Video : आई मोबाईलमध्ये इतकी बिझी झाली की मुल कुठे ठेवलं तेच विसरली, व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल

आजचं जग हे सोशल मीडियाचं जग झालं आहे. लोक दिवसातील बराच वेळ मोबाईलवरच व्यतीत करत असतात. त्यामुळे तरुणांना याचं व्यसन लागलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून : आजचं जग हे सोशल मीडियाचं जग झालं आहे. लोक दिवसातील बराच वेळ मोबाईलवरच व्यतीत करत असतात. त्यामुळे तरुणांना याचं व्यसन लागलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तरुणच नाही तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच याचा वापर करतात. मात्र कधी कधी याचा अतिवापर लोकांच्या अंगलट येतो. लोक काम करायला विसरतात, महत्त्वाच्या गोष्टी विसरतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतोय. एक महिला मोबाईलच्या नादात आपलं बाळच कुठे ठेवलंय ते विसरते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत घेत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मोबाईलमध्ये बिझी दिसत आहे आणि दुसरीकडे ती तिच्या पायाने बेबी वॉकर फिरवत आहे. तिने एका मुलाला दुसऱ्या हातात धरले आहे. अचानक महिलेचे लक्ष फोनवरून वॉकरकडे गेले आणि तिला धक्काच बसला. तिला वाटलं आपलं बाळ कुठेतरी गेलं. ती घरात बाळ शोधू लगाते. नंतर तिला समजतं की तिचं बाळ तर तिच्याकडेच आहे.

हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 21 सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

दरम्यान, मोबाईलच्या वापरामुळे लोकांचं आपल्या आसपासच्या जगाकडेही लक्ष जात नाही. मोबाईल वापरण्यात ते इतके बेधुंद होतात की, बाकीच्या गोष्टींचं त्यांना भानच राहत नाही. त्यामुळे मोबाईलचा वपर हा जेवढा चांगला आहे तेवढाच घातकही. कधी मोबाईलचा वापर तुमच्या जीवावर येईल काही सांगू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या