JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातील सर्वात दुर्दैवी आई! 11 मुलांना दिला जन्म, पण जन्मापासून सर्वच्या सर्व अंध; कारण...

जगातील सर्वात दुर्दैवी आई! 11 मुलांना दिला जन्म, पण जन्मापासून सर्वच्या सर्व अंध; कारण...

महिलेच्या अकरापैकी एकाही मुलाला जन्मापासूनच दृष्टी नाही.

जाहिरात

महिलेची अकराही मुलं अंध (फोटो - इंटरनेट)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केनिया, 29 जुलै : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अनमोल असा क्षण. पण बाळाच्या जन्मानंतर त्याची काही उणीव निघाली की त्या बाळाची चिंता वाटतेच. तरी कसंही असलं तरी ते बाळ आईला प्रियच असतं. त्यामुळे ती त्याचा आयुष्यभर सांभाळ करते. पण असं दुर्दैव एका आईच्या वाट्याला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल अकरा वेळा आलं. तिने 11 मुलांना जन्म दिला पण अकराच्या अकरा मुलं जन्मापासूनच अंध आहेत. केनियाच्या किसुमु गावात राहणारी अॅग्नेस नेस्पोंडी. जिचं लग्नानंतर आयुष्य खूप सुंदर होतं. ती पहिल्यांदा प्रेग्नंट झाली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. तिला पहिलाच मुलगा झाला. अॅनग्नेस आणि तिच्या नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण काही कालावधीने बाळात काहीतरी उणीव असल्याचं दिसून आलं. बाळाला नीट दिसत नसल्याचा संशय तिला आणि तिच्या पतीला आला. त्यामुळे त्यांनी ्याला रुग्णालयात नेलं. तर बाळाची दृष्टी नाही ते अंध असल्याचं निदान झालं. सुरुवातीला डॉक्टरांनासुद्धा हे समजलं नाही. Weird Tradition : इथं मृत्यूनंतर लहान मुलांचं होतं झाड; कसा होतो हा चमत्कार? एका बाळाचं ठिक आहे. यानंतरचं मूल तरी चांगलं असेल अशी आशा या दाम्पत्याला होती. यानंतर ती दहा वेळा प्रेग्नंट झाली. या दहाही वेळा तिला मुलंच झाली. पण एकामागोमाग एक जन्माला आलेली ही सर्व मुलंही अंधच होती. अॅग्नेसने अकरा मुलांना जन्म दिला आणि अकराच्या अकरा अंध. यापेक्षा दुसरं दुःख आईला काय असेल. तरी तिने आणि तिच्या पतीने त्यांचा सांभाळ केला. पण 21 वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं. तेव्हापासून ती एकटी या मुलांची काळजी घेत आहे. पण हे तिला खूप कठीण होतं आहे. मुलं म्हणजे वृद्धापकाळात आधार असतात. अॅग्नेसला तर अकरा मुलं. तिचा पहिल्या मुलाने वयाची चाळीशी पार केली आहे. पण तिचं दुर्दैव बघा. इतकी मुलं असूनही ती अंध असल्याने म्हातारपणात या तरुण अंध मुलांचीच तिला काळजी घ्यावी लागते आहे. तरी ही मुलं भीक मागून आपल्या आईला मदत करत आहेत. प्रयागराजमधील अजब घटना! 7 महिन्यांचं बाळ प्रेग्नंट; पोटातून काढलं 2 किलोचं दुसरं ‘बाळ’ गावातील लोक अॅग्नेसला शापित म्हणतात. कुणीतरी तिच्यावर काळी जादू केली आहे, म्हणून तिची सर्व मुलं अंध जन्माला आली असं म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या