JOIN US
मराठी बातम्या / Viral / लेक शेर तर आई सव्वाशेर! ऑन द स्पॉट एका क्षणात खल्लास केला 'खेळ'

लेक शेर तर आई सव्वाशेर! ऑन द स्पॉट एका क्षणात खल्लास केला 'खेळ'

सर्वांसमोरच आईने मुलीचा भांडाफोड केला आहे.

जाहिरात

आईने वाजवला लेकीचा बँड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑगस्ट : हल्लीची मुलं फार हुशार असतात. आपल्या पालकांनाही ते मागे टाकतात. पण लहान मुलांप्रमाणे वयस्कर नागरिकांनाही कमी समजू नका, तेसुद्धा हुशारीत मागे नाहीत. भले त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी वृद्ध माणसं आपल्या मुलांची लबाडी एका क्षणात पकडतात. सध्या अशाच एका मायलेकीचा (Mother daughter video) मजेशीर व्हिडीओ (Funny video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका मुलीने जादू (Magic video) दाखवत सर्वांना आकर्षित (Woman showing magic trick) करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आईने मात्र तिचा खेळ खल्लास केला. तिचं पितळ सर्वांसमोर उघडं पाडलं. नेमकं झालं काय व्हिडीओत पाहा.

संबंधित बातम्या

आईने आपल्या मुलीच्या मॅझिक ट्रिकची चांगलीच बँड वाचवली आहे. ज्या व्हिडीओत ती जादू दाखवत होती तिथंच ऑन द स्पॉट आईने तिचा भांडाफोड केला आहे. हे वाचा -  ‘ए मम्मी आ गई क्या…’ म्हणता म्हणता खरंच आली आई आणि…; असा झाला चिमुकलीच्या VIDEO चा शेवट व्हिडीओत पाहू शकता महिला जादू दाखवण्याचा प्रयत्न करते. ती एका काचेच्या ग्लासमध्ये मेणबत्ती लावून ती पेटवते आणि त्यात पाणी भरते. पाण्याने ती ग्लास पूर्ण भरते ज्यामुळे मेणबत्ती पाण्यात पूर्ण बुडते. पण आश्चर्य म्हणजे पाण्यात मेणबत्ती बुडाली तरी ती विझत नाही. पाहताच आल्यालाही आश्चर्य वाटतं. महिलेची जादू पाहून आपण थक्कच होतो, असं कसं शक्य आहे, तेच समजत नाही. शेवटी या महिलेची वयस्कर आई येते आणि ती असं काही करते ज्यामुळे आपल्याला हे कसं काय शक्य आहे, याचं उत्तर मिळतं आणि या महिलेची म्हणजे तिच्या लेकीची चांगलीच फजिती होते. महिलेची आई तो ग्लास उचलते आणि त्यामागील सत्य समोर येतं. महिलेने जी मेणबत्ती लावली आहे ती ग्लासच्या बाहेरून ग्लासला चिटकवलेली आहे. हे वाचा -  बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम आईने असं करताच महिलेच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. पण व्हिडीओ पाहून आपल्याला मात्र हसू आवरत नाही.  hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या