JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओला स्कुटरचा वापर असा ही? Video पाहून पोट धरुन हसाल

ओला स्कुटरचा वापर असा ही? Video पाहून पोट धरुन हसाल

तुम्ही रस्त्यातून जाताना अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल की या गाडीवरुन फिरणारे लोक जोरजोरात गाणी लावून फिरतात आणि याच स्पिकरचा फायदा एका तरुणाने भलत्याच गोष्टीसाठी केला आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 डिसेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे खरंच खुप सुंदर असतात. तर काही व्हिडीओ हे विचित्र असतात, म्हणून ते लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल आणि या लोकांच्या क्रिएटीव्हिटीची कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकणार नाही. खरंतर हा एक जुगाड आहे, जो एका व्यक्तीने ओला स्कुटरसोबत केला आहे. हे ही पाहा : चिमुकल्यांनी वाचवले आईचे प्राण, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल ओलानं आपली नवीन इलेक्ट्रीक स्कुटर बाजारात लॉच केली आहे. या स्कुटरमध्ये वेगवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला सगळ्या गाड्यांपासून वेगळं ठेवते. त्यांपैकी सर्वात पॉप्यूलर फीचर म्हणजे या स्कूटरला असलेले स्पीकर तुम्ही रस्त्यातून जाताना अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल की या गाडीवरुन फिरणारे लोक जोरजोरात गाणी लावून फिरतात आणि याच स्पिकरचा फायदा एका तरुणाने भलत्याच गोष्टीसाठी केला आहे. खरंतर या स्पिकरवर एक व्यक्ती live कॉमेंट्री करत आहे. जी एखाद्या स्पीकरवरच लावली असल्याचं भासत आहे. हा एक जुगाड आहे, जो तरुणांने स्पीकरच्या बदल्यात केला आहे. या तरुणाचा हा जुगाड पाहून खूद्द कंपनीचा मालक देखील आश्चर्यचकीत झाला आहे. गाडीच्या स्पीकर फिचरचा असा वापर खरंच विचार करायला लावणारं आहे. नक्की काय घडलं? व्हिडीओमध्ये खेळाच्या मैदानात सामना सुरू आहे आणि बाजूला हा मुलगा क्रिकेट कॉमेंट्री करत आहे. ही स्कूटर शेजारी उभी आहे. हा तरुण हाता फोन घेऊन उभा आहे आणि त्यावर ही कॉमेंट्री करत आहे. त्याने खरंतर आपला फोन वायरलेस कनेक्शनद्वारे ओला ई-स्कूटरशी कनेक्ट केलेला आहे.

संबंधित बातम्या

स्कूटरच्या स्पीकरमुळे त्याच्या कॉमेंट्रीचा आवाज इतका छान येत आहे की, तो तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ऐकू येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ ओडिशातील कटकचा आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की खुद्द भाविश अग्रवालही या तरुणाचे स्वतःचे कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत. या व्हायरल व्हिडीओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या