क्युट माकडाचं पिल्लू फळं खाताना
मुंबई 27 सप्टेंबर : लहान मुलं ही खूपच गोंडस आणि निरागस असतात, ज्यामुळे ते काहीही करु देत, पण ते पाहाताना आपलं मन अगदी प्रसन्न होतं. सोशल मीडियावर देखील आपल्याला यासंबंधीत अनेक फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळता, जे पाहाताना खूपच छान वाटतं. सध्या एका गोंडस बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच चर्चे आहे. पण हे बाळ एका माकडाचं आहे. खरंतर प्राणी देखील लहान बाळांप्रमाणे फारच गोंडस आणि प्रेमळ असतात, त्यामुळे ते जे करतात ते आपल्याला एक टक पाहातच राहावसं वाटतं. या माकडाच्या पिल्लाचा हा व्हिडीओ देखील असाच मन प्रसन्न करणारा आहे. हे ही पाहा: आपल्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलेल्या जयेशचं बदललं आयुष्य, Video Viral झाल्यानंतर अशी आहे परिस्थिती हा व्हिडिओ आत्तापर्यंत 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तसेच त्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकडाचं पिल्लू आहे, जे खूप लहान आहे पण ते दिसायला इतकं सुंदर आहे की, त्याला पाहाताच क्षणी तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. खरंतर हे लहान पिल्लू आपल्या आईपासून वेगळं झालं आहे, ज्याला एक व्यक्ती खाण्यासाठी देत आहे आणि हे पिल्लू देखील ते आपल्या हाताने घेऊन खात आहेत.
हे ही पाहा: वडिलांचे 60 वर्षांपूर्वीचे पासबुक सापडले आणि मुलाचे नशीबच पालटले, काय आहे हे प्रकरण? वाचा या व्हिडिओमध्ये तुम्ही पहाल की एक लहान माकडाचे बाळ जे दिसायला खूप सुंदर दिसत आहे ते काही कारणास्तव नुकतेच त्याच्या आईपासून वेगळे झाले आहे ज्याला एका दयाळू माणसाने दूध पाजले आहे. माकडाच्या लहान मुलाची अन्न खाण्याची शैली लोकांना खूप आवडते किंवा सोशल मीडियाच्या यूट्यूब साइटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे.