गार्डच्या धाडसीपणामुळे चोर पकडले
दिल्ली 30 सप्टेंबर : सोशल मीडियावर तुम्ही चोरीशी संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असती, परंतू एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो कदाचित तुम्ही कधी पाहिलाच नसेल. हा चोरीचा व्हिडीओ अगदी अंगावर काटा आणणारा आहे. परंतू गार्डच्या चातुर्यानं या चोरींना पकडण्यात यश आलं आहे. ज्यामुळे लोक या व्हिडीओ जोरदार शेअर आणि लाईक करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ बाईक चोरीचा आहे. ज्यामध्ये दोन चोर बाईकची चोरी करुन ती भरधाव वेगाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. परंतू हे तेथील गार्डच्या लक्षात येतं आणि तो धावत जाऊन दोन्ही गेट लावतो. चोरांना वाटतं की, ते मधील गॅपमधून निघून जातील. परंतू तसं न होता, ते मध्येच अडकले आणि दोन्ही चोर खाली पडले. हे पाहा : साधूच्या सांगण्यावरून स्वतःला 6 फूट जमिनीखाली गाडलं, पोलीसांनी येऊन पाहिलं तेव्हा… Video Viral हे चोर ज्या वेगाने त्या गेटला धडकले आहेत, ते पाहून त्यांना किती गंभीर दुखापत झाली असेल, याचा अंदाज तुम्हाला येईल. यासाठी तुम्ही आधी हा व्हिडीओ पाहा.
व्हायरल झालेला चोरीचा व्हिडीओ हा दिल्लीमधील एका कॉलिनीतील असल्याचा सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये हे चोर नगर निगम अधिकारी बनुन आले होते. ज्यानंतर त्यानी त्याच कॉलनीत उभी असलेली एक बाईक चोरली. जी लगाचेच गार्डच्या लक्षात आली. ज्यानंतर या गार्डने त्यांना थांबवण्यासाठी गेट लावला, ज्यामुळे हे भामटे आता लोकांच्या हाती लागले आहेत. हे पाहा : चोरांनी शिव मंदिरात चोरल्या सोनं-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच… पाहा Video हा व्हिडीओ आदित्य तिवारी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केला आहे. जो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओला शेअर आणि कमेंट केलं आहे. तसेच या गार्डच्या चातुर्याचं आणि शौर्याचं कौतुक देखील केलं आहे.