व्हायरल व्हिडीओ
लखनऊ 3 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे एक मनोरंजनाचं माध्यम तर आहेच. शिवाय हे माध्यम आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणे आणि जनजागृती करण्याचं काम देखील करते. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर कोणीतरी एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे आणि त्याला सोशल मीडियावर शेअर केला. जेणे करुन लोकां समोर काही भामट्यांचा खरा चेहरा समोर येईल. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका वर्गातील आहे. जेथे एक शिक्षक वर्गात दारु पिऊन मुलांना शिकवत आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावरील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओत तुम्हाला आधी एका टेबलाच्या बाजूला दारूची बाटली दिसेल, त्यानंतर एक व्यक्ती दिसेल, जी खूर्चीवर बसली आहे आणि त्या व्यक्तीच्या मागे बिअरचा कॅन देखील आहे. तुम्हाला सुरुवातीला व्हिडीओ पाहून हे कळणार नाही की हा व्हिडीओ नक्की कुठला आहे. पण नंतर जेव्हा कॅमेरा फिरतो, तेव्हा तुम्हाला समोर शाळेच्या गणवेशात काही मुलं बसलेली दिसतली. हे ही पाहा : गाईला त्रास देणाऱ्या तरुणाला घडली चांगलीच अद्दल, Video पाहून म्हणाल, ‘‘याला म्हणतात कर्माचं फळ’’ ज्यावरुन हे लक्षात येत आहे की, हा शिक्षक वर्गातच दारु पित आहे. जे खरोखरंच खूप चुकीचं आहे.
खरंतर लहान मुलांसाठी ते गुरु असतात आणि पहिला पाया शिक्षकच असतात. पण जर शिक्षकचं असं करु लागले तर मग मुलांना काय शिकवण मिळणार? यावरच प्रश्न उपस्थीत राहिले आहे. हे ही पाहा : King Cobra शी खेळ करणं त्याच्या जीवावर बेतलं, Kiss करायला तोंड पुढे नेलं आणि… पाहा Video हा व्हिडीओ यूपीमधील हाथरसमधील असल्याची माहिती मिळत आहे. ज्यावर लोक भरभरुन कमेंट्स आणि शेअर करत आहेत. लोकांनी या शिक्षकाला खूपच ट्रोल केलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई करावी अशी अनेकांची मागणी आहे.