JOIN US
मराठी बातम्या / Viral / पाण्याच्या शोधात गच्चीवर आली माकडीण, पुढे काय घडलं पाहा VIDEO

पाण्याच्या शोधात गच्चीवर आली माकडीण, पुढे काय घडलं पाहा VIDEO

उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानं पाण्याच्या शोधात अनेक प्राणी-पक्षी भटकताना दिसतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मार्च : उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानं पाण्याच्या शोधात अनेक प्राणी-पक्षी भटकताना दिसतात. मुंबईत असंच एक दृश्य पाहायला मिळालं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणारी माकडीण एका इमारतीच्या गच्चीवर दिसून आली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये प्रत्येकजण आपली कामं करण्यात व्यस्त असतो. अशावेळी सिमेंटच्या जंगलात प्राणी पाहायला मिळणं अवघडच. त्यातही माकड आपल्या हातानं पाणी पित असल्याचं पाहायला मिळणं फार दुर्मीळ आहे. भर उन्हात पाण्याच्या शोधात ही माकडीण वणवण भटकत होती. तिला इमारतीच्या गच्चीत पाणी सुरू असल्याचा सुगावा लागला आणि ती त्या गच्चीपर्यंत पोहोचली. तिथे छोट्या पाईपमधून पाणी वाहात असल्याचं पाहाताच तिला आनंद झाला. तिने सुरुवातील पाईपला तोंड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला नीट पाणी पिता येईना शिवाय सिमेंट गरम असल्यानं तोंडही भाजत होतं माग तिने पाईप तोंडाला लावून पाणी पिण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही माकडीण कशा पद्धतीनं पाणी पित आहे हे आपण पाहू शकता. सतत धावणाऱ्या मुंबईकरांचं या व्हिडीओनं मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. हे वाचा- VIRAL VIDEO नंतर आता सोशल मीडियात सुरू आहे शेवटाचा शोध… काय झालं असेल? हे वाचा- इंग्रजीत घडाघडा बोलणाऱ्या 70 वर्षांच्या आजीला शशी थरूर किती मार्क देणार?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या