JOIN US
मराठी बातम्या / Viral / उन्हाळ्याच्या तडाख्याने माकडेही करु लागली स्विमिंग, मजेशीर Video व्हायरल

उन्हाळ्याच्या तडाख्याने माकडेही करु लागली स्विमिंग, मजेशीर Video व्हायरल

उन्हाळा सुरु असून गरमीने सर्वांना हैराण परेशान केलं आहे. दिवसेंदिवस कडक उन्हामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जाहिरात

माकडांचा मजेशीर व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 एप्रिल : उन्हाळा सुरु असून गरमीने सर्वांना हैराण परेशान केलं आहे. दिवसेंदिवस कडक उन्हामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करातना पहायला मिळतात. माणूनसच नाही तर प्राणीदेखील गरमीपासून वाचण्यासाठी काहीतरी जुगाड करत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये माकडांची टोळी गरमीपासून वाचण्यासाठी पाण्यात डुबकी मारत आनंद लुटत आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

उन्हाच्या तीव्रतेमुळे काही लोक शहर किंवा गावाजवळून वाहणाऱ्या नदी किंवा तलावात आंघोळ करून आपले शरीर थंड ठेवत आहेत. उष्णतेचा परिणाम प्राण्यांवरही होतो. अशा परिस्थितीत शरीर थंड ठेवण्यासाठी काही माकडे पाण्याच्या टाकीत उड्या मारताना दिसून आले. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शहरी भागात राहणारी माकडे उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीचे झाकण उघडून अंघोळ करताना आणि मजा करताना दिसत आहेत. एका पाठोपाठ एक माकड पाण्याच्या टाकीत उतरुन थंड पाण्याने अंघोळ करत मजा घेत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. माकडांचा मजेशीर व्हिडीओ ghantaa या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. एकापेक्षा अधिकवेळा लोक हा व्हिडीओ पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या