व्हायरल
नवी दिल्ली, 23 एप्रिल : आजकाल जंगलातील माकडांचा वावर मानवी वस्तीकडे वाढलेला आहे. अनेक ठिकाणी माकडे सर्रास फिरताना पहायला मिळतात. माकड जितके हुशार, तितकेच खोडकरही त्यामुळे ते दिसल्यावर काही ना काही विचित्र, मजेशीर घटना घडल्याशिवाय राहत नाही. अचानकपणे येऊन असं काही तरी करुन जातं की सगळेच अवाक् होतात. सध्या अशीच एक घटना समोर आलीये ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही महिला आपल्या मुलांना रस्त्यावरून एका घेऊन जात आहेत आणि माकडेही काही अंतरावर बसलेली दिसत आहेत. लोकांच्या पाठीवर ठेवलेली लाल पिशवी पाहून माकडाला वाटतं की त्यात काहीतरी खायला असेल. मग काय, हे लोकांच्या जवळ गेले आणि ती बॅग घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर त्याला समोर एक चिमुकली मुलगीही दिसते. तर तो अचानक त्या छोट्या बाळाचे केस ओढू लागतो. मग लोक बाळाला आपल्याकडे ओढून घेतात.
@IamSuVidha नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १२ सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, तुम्ही अनेक व्हिडिओंमध्ये माकडांना गुंडगिरी करताना पाहिले असेल. कधी ते कोणाचा चष्मा घेऊन पळून जातात तर कधी कोणाचा तरी खाद्यपदार्थ हिसकावून घेतात. त्यामुळे यापूर्वीही माकडांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.