मुंबई, 28 मे : लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ वाघ आणि वानराच्या लढाईचा आहे. झाडावरून टणाटणा उड्या मारीत जाणाऱ्या वानरानं वाघाची खोड काढली आणि वाघानंही धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला मात्र या हल्यात काय झालं हा गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता आधी वानर झाडावर खेळत आहे. त्याला खाली शांत बसलेले दोन वाघ दिसतात. मग काय वानर त्यांची खोड काढतो. आता खोड काढल्यावर वाघ शांत थोडीच बसेल तर त्यांनही संधी साधून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानं वानराला चीड आली आणि त्यानं सणसणीत वाघाच्या काशिलात लगावली. मग काय चिडलेला वाघही या वानराचा पाठलाग करू लागला.
हे वाचा- धाडसी आजी! नागाची शेपटी पकडून त्याला घराबाहेर काढलं, VIDEO VIRAL
IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा असंही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. वानरानं वाघाची कशी जिरवली आणि त्यांच्यातल्या हल्ल्याचा खेळ कसा रंगला हे या व्हिडीओमध्ये आहे. आतापर्यंत 3 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 400 हून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक रिट्वीट करण्यात आलं आहे. हे वाचा- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO हे वाचा- बाप रे! रेड झोनमधून आलेला घोडासुद्धा माणसाप्रमाणं झाला क्वारंटाइन संपादन- क्रांती कानेटकर