JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: शाळकरी मुलीला धक्का देत खाली पाडलं अन्...; माकडाचं हे कृत्य पाहून व्हाल हैराण

VIDEO: शाळकरी मुलीला धक्का देत खाली पाडलं अन्...; माकडाचं हे कृत्य पाहून व्हाल हैराण

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक माकड बाईकवर बसलेलं आहे आणि त्याच्याजवळ असलेल्या लाईनमध्ये बऱ्याच शाळकरी मुली उभा आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) अतिशय मजेशीर व्हिडिओ (Funny Video) पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून हसू आवरणं कठीण होतं. आपल्या सर्वांना प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय भीतीदायक तर काही मजेशीर असतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, तो अतिशय मजेशीर (Viral Video of Monkey) आहे. ज्या व्हिडिओबद्दल आम्ही बोलत आहोत, त्यात एक माकड पाहायला मिळतं. या माकडाच्या आसपास शाळेतील भरपूर मुली आहेत. व्हिडिओमध्ये पुढे असं काही पाहायला मिळतं, जे पाहून सगळेच हैराणही झाले आणि पोट धरून हसू लागले. लग्नातच नवरदेवाने दाखवले नको ते रंग; रागाने लालभडक झाली नवरीबाई; Video viral व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक माकड बाईकवर बसलेलं आहे आणि त्याच्याजवळ असलेल्या लाईनमध्ये बऱ्याच शाळकरी मुली उभा आहेत. काही वेळानं बाईकवर बसलेलं माकड धावत लाईनमध्ये उभा असलेल्या मुलीच्या जवळ जातं. यानंतर हे माकड मुलीला जोरात धक्का देतं. यानंतर ही मुलगी जमिनीवर कोसळते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक कमेंट करून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) शेअर केला गेला आहे. हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. सोबतच अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. VIDEO: तोल गेला अन् धाडकन पाण्यात कोसळला सिंह, पाहा पुढे काय घडलं या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरनं लिहिलं, माकडं तशीही फार चपळ असतात. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हे माकड किती स्मार्ट आहे. संधी मिळताच फायदा घेतला. तिसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की शाळेच्या परिसरात हे रेकॉर्डिंग कोण करत आहे आणि या व्यक्तीला हेदेखील माहिती आहे, की माकड पुढे काय करणार आहे. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या