JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे बापरे! माकडाने मालकाच्या डोक्यावर केले तलवारीने वार; VIDEO VIRAL

अरे बापरे! माकडाने मालकाच्या डोक्यावर केले तलवारीने वार; VIDEO VIRAL

माकडाला प्रशिक्षण देणं मालकाला पडलं महागात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : माकडाच्या (Monkey) हाती कोलीत लागल्यावर काय होतं हे आपल्या बोधकथेतून माहितीच आहे. सध्या अशाच एका माकडाचा व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात त्याच्या हातात कोलीत नाही पण चाकू (Monkey attack video) लागला आहे. हातात चाकू येताच माकडाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या मदाऱ्यावरच त्याचा खेळ उलटला आहे (Monkey attacking on man). माकड आणि मदाऱ्याचा शॉकिंग व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल  (Monkey attacking with sword). माकडं किती तरी वेळा अगदी माणसांप्रमाणे हुबेहूब वागण्याचा ते प्रयत्न करतात. त्यात तर ते बिलकुल कसर सोडत नाही. त्यांना प्रशिक्षण दिलं तर ते जसंच्या तसं करतात. अशाच एका माकडाला ट्रेनिंग देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. ट्रेनिंगवेळी माकडाला राग आला आणि माकडाने प्रशिक्षकावरच हल्ला केला आहे.

व्हिडीओत पाहू शकता माकडाच्या हातात एक तलवार आहे. त्याच्यासमोर असलेली व्यक्ती माकडाचा हात हातात धरून तलवार धरून हळूहळू आपल्या डोक्यावर कशी मारायची हे दाखवते. जशी ही व्यक्ती त्या माकडाचा हात सोडते तसं माकड त्या व्यक्तीच्या डोक्यावर जोरजोरात तलवारीने वार करतं, व्यक्तीही आपलं डोकं धरते. हे वाचा -  बापरे! अस्वलाने प्रेग्नंट महिलेला जमिनीवर आपटलं; सर्कसमधील भयंकर हल्ल्याचा VIDEO सुदैवाने माकडाच्या हातातील तलवार खरी नाही आहे ती खोटी आहे.  @RexChapman यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.याआधीही एका माकडाने खेळ सुरू असताना मदाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. mixx_upp इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

व्हिडीओत पाहू शकता, तीन-चार माकडं आहेत. त्यापैकी एक माकड मोठ्या हुशारीने मदाऱ्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतो (Monkey snatching knife from madari). त्यानंतर तो त्या चाकूने मदाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मध्ये मध्ये पाहू शकता माकड चाकू जमिनीवर घासतो. म्हणजे तो त्या चाकूला धार काढतो आहे. त्यानंतर पुन्हा तो चाकू मदाऱ्याच्या दिशेने करतो. कदाचित त्याने आपल्या मदाऱ्याला चाकूला असं धार काढताना पाहिलं असावं. माकडाने मदाऱ्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत मदाऱ्यावरच  हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे वाचा -  युवकाच्या गळ्याभोवती कोब्र्यानं घातला विळखा अन्…; थराकाप उडवणारा VIDEO किती तरी वेळ माकड मदाऱ्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवतं. पण अशा आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या माकडाला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं याची ट्रिक मदाऱ्यांकडे असतेच. या मदाऱ्यानेही त्या ट्रिकचा वापर केला. त्याने सुरुवातीला माकडाच्या हातातून चाकू मागून काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण माकड काही ऐकेना. शेवटी मदारी आपल्या बाजूला असलेल्या झोळीतून एक छोटीशी बंदूक काढतो. आपल्या हातात एक ती बंदूक धरून तो माकडाला दाखवतो. बंदूक पाहताच माकड घाबरतं आणि गुपचूप ते शहाण्यासारखं आपल्या हातातील चाकू मदाऱ्याच्या हातात देतं. यानंतर मदारी पुन्हा माकडाच्या हातात चाकू देतं. तेव्हा मात्र माकड शांत असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या