नवी दिल्ली 22 मार्च : अॅडल्ट कंटेंट क्रिएटर्सना समाजात म्हणावा असा मान दिला जात नाही. मात्र त्यांचं काम खूप अवघड आहे. पैसे कमावण्यासाठी त्यांना त्यांच्या चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात राहावं लागतं आणि नेहमी स्वतःशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहावे लागतात. मग त्यांची तब्येत कितीही बिघडलेली असली तरीही यातून सुटका नसते. असंच काहीसं नुकतंच एका अॅडल्ट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मॉडेलसोबतही झालं. तिला अत्यंत गंभीर अशा मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी (Brain Surgery) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथूनही अॅडल्ट कंटेंट बनवण्यास सुरुवात केली (Model Made Adult Content in Hospital). ग्राहकाच्या दरवाजातच डिलीव्हरी बॉयचं कांड; कॅमेऱ्यात कैद झालं संतापजनक कृत्य डेली स्टारच्या अहवालानुसार, रुबी मे ही 25 वर्षीय अॅडल्ट स्टार ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे राहते आणि ती ओन्ली फॅन्स या सब्सक्रिप्शन साइटवर एक अॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहे. काही काळापूर्वी तिला अचानक चक्कर येऊ लागली आणि सुमारे 10 सेकंद तीव्र डोकेदुखी झाली. जेव्हा ही लक्षणं मर्यादेपलीकडे वाढली तेव्हा ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेली आणि तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की तिला Chiari Malformation आहे. ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यात माणसाच्या कवटीचा एक भाग योग्यरित्या विकसित होत नाही आणि त्यामुळे पाठीच्या कण्यावर दबाव येतो.
रुबीला 4 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या गंभीर शस्त्रक्रियेमुळे तिला 5 दिवस रुग्णालयात काढावे लागले. तिचं ऑपरेशन तीन तास चालले आणि तिला बरं होण्यासाठी रुग्णालयात जास्त वेळ घालवावा लागला, परंतु या काळातही तिने ओन्ली फॅन्ससाठी अॅडल्ट कंटेंट बनवणं थांबवलं नाही (Adult Model Make Videos in Hospital). तिने सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ओन्ली फॅन्ससाठी न्यूड फोटो काढण्यास सुरुवात केली. तिचं म्हणणे आहे, की ओन्ली फॅन्स हेच तिचं जगण्याचं एकमेव साधन आहे आणि त्यातून तिला पैसे मिळत असल्याने ती कंटेंट तयार करण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही.
रिपोर्टनुसार, रुबीच्या ऑपरेशनमध्ये 15 लाखांहून अधिक पैसे खर्च झाले आणि तिने हे सर्व पैसे ओन्लीफॅन्सच्या कमाईतून दिले. सोशल मीडियावर तिने सर्जरीशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत. ती म्हणाली की ती एमआरआय स्कॅनसाठी गेले यासाठी स्वत:ला भाग्यवान समजते. कारण याबद्दल खुलासा झाला नसता तर तिची शस्त्रक्रिया झाली नसती आणि तिला अर्धांगवायू झाला असता किंवा तिला मेंदूचा कर्करोगही होऊ शकत होता.