JOIN US
मराठी बातम्या / Viral / विवाहित पुरुष करत होता दुसरे लग्न, पत्नीला समजताच उचललं मोठं पाऊल

विवाहित पुरुष करत होता दुसरे लग्न, पत्नीला समजताच उचललं मोठं पाऊल

लग्न झालेलं असताना ही एका व्यक्तीने दुसऱ्या मुलीशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा प्रकार अखेर त्याच्या बायकोसमोर आलाच.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाल 19 ऑक्टोबर : लग्नासंबंधीत आपल्याला बऱ्याचदा अशा काही बातम्या ऐकायला मिळतात, ज्यावरती विश्वास ठेवणं देखील कठीण जातं. कधी कधी आपल्याला नवरा बायकोमध्ये अधिक प्रेम दिसतं तर कधी अगदी छोट्या कारणामुळे त्यांच्यात भांडणं होत असल्याचं आपल्याला दिसतं. पण सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यावरती विश्वास ठेवणं देखील कठीण झालं आहे. याप्रकारात लग्न झालेलं असताना ही एका व्यक्तीने दुसऱ्या मुलीशी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा प्रकार अखेर त्याच्या बायकोसमोर आलाच. हे प्रकरण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वरशिवनी येथील आहे . येथे बौद्ध विहारात एका विवाहित तरुणाने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याने वाद झाला. हे ही वाचा : ती अनोळखी व्यक्तीसोबत चॅट करत राहिली, पण भेटायला गेली तेव्हा चकर येऊन पडली वारसिवनी येथील रहिवासी रूपा भोटेकर यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२० मध्ये तिचे लग्न बालाघाट येथे किरणापूरचे रहिवासी सुनील भोटेकर यांच्यासोबत पूर्ण रितीरिवाजाने झाले होते. परंतू लग्नानंतर तिच्या सासरच्यांनी दोन लाख रुपये आणि गाडीची मागणी सुरू केली. तसेच जेव्हा रुपाचे वडिल त्यांना हुंडा देऊ शकले नाहीत, तेव्हा कुटुंबातील सगळ्यांनी अनेकदा त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. हे ही वाचा : गाडीचे तुकडे-तुकडे, तर ड्रायव्हर हवेत… टोलनाक्यावरील थरारक Video अंगावर काटा आणणारा वारसिवनीच्या बुद्ध विहारमध्ये सुनीलचे दुसरे लग्न होत असल्याची माहिती जेव्हा रुपाला मिळाली, तेव्हा तिने लगेचच पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांच्या मदतीने हे लग्न थांबवले. या प्रकरणा विषयी सांगताना एसडीओपी आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले की, वादाची माहिती मिळताच दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले, आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच नवऱ्यावरती कारवाई देखील केली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या