नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : स्वप्नं (Dream) पाहाणं कोणाला आवडत नाही? जगात कदाचित अशी कोणी व्यक्ती असेल ज्यानं आरामात आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहिलं नसेल. मात्र, अनेकांची स्वप्न वेगळी असतात. काहींना श्रीमंत होऊन घर विकत घ्यायचं असतं, काहींना कार तर काहींना फिरायला जायचं असतं. मात्र, अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये (TV Show) आलेल्या एका व्यक्तीला जेव्हा रिपोर्टरनं विचारलं की तो श्रीमंत होऊन काय करणार? तेव्हा त्यानं असं उत्तर दिलं, ज्यानं पोलिसांचंही लक्ष वेधलं. या व्यक्ती ड्रग्जच्या आहारी (Drug Addict) गेला होता आणि त्यानं याबाबतच स्वप्न पाहिलं होतं. VIDEO : या मांजराचं धाडस पाहून व्हाल थक्क; कोल्ह्यांना घडवली अद्दल या व्यक्तीचं नाव जेम्स असं आहे. जेम्सनं प्रेक्षक आणि रिपोर्टर दोघांनाही आपल्या उत्तरानं हैराण केलं. जेम्सनं एक लॉटरीचं तिकिट विकत घेतलं होतं. या लॉटरी तिकिटच्या जॅकपॉटमध्ये सातशे मिलियन डॉलरचं बक्षीस होतं. म्हणजेच जवळपास ५२ अरब रुपये. जेम्सनंही हे तिकिट विकत घेतलं होतं. जेव्हा रिपोर्टरनं त्याला विचारलं की इतके पैसे जिंकून काय करणार, तेव्हा जेम्सनं सरळ उत्तर दिलं की या पैशातून मी पाच किलो कोकिन विकत घेणार. हे उत्तर ऐकून रिपोर्टरही हैराण झाला. KSLA टीव्हीची रिपोर्टर कोरी जॉनसन या लॉटरी तिकिट विकणाऱ्या दुकानात उपस्थित होती. ती तिकिट विकत घेणाऱ्या लोकांना लॉटरी जिंकल्यानंतरचं त्यांचं प्लॅनिंग विचारत होती. इतक्यात लाईव्ह शोमध्ये जेम्सची एन्ट्री झाली. त्यानंही तिकिट विकत घेतलं होतं. जेव्हा कोरीनं जेम्सला विचारलं, तेव्हा सुरुवातीला त्यानं कार खरेदी करणार असल्याचं सांगितलं. यानंतर अचानक तो म्हणाला की या पैशातून तो ड्रग्ज खरेदी करणार आहे. आपल्या या प्लॅनिंगबद्दल सविस्तर बोलताना जेम्सनं सांगितलं, की आधी तो एक महागडी कार खरेदी करेल. यानंतर पाच किलो कोकीन खरेदी करणार. हे ऐकून कोरी हैराण झाली. PHOTOS: शेतकऱ्याच्या मुलाने लावला चहाचा स्टॉल; आता 22 शहारांमध्ये घालतोय धुमाकूळ नॅशनल टीव्हीवर ड्रग्ज विकत घेणार असल्याचा खुलासा केल्यानं एकच खळबळ उडाली. कोरीनं अगदी प्रोफेशनली ही बाब सांभाळली. तिनं लगेचच विषय बदलला आणि कार विकत घेण्याकडे जेम्सचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ती जेम्सला त्याच्या ड्रीम कारबद्दल विचारू लागली. कोरीच्या या मुलाखतीची क्लिप ट्विटरवर शेअर झाली आणि तिथूनच ती व्हायरल झाली. अनेकांना ही मुलाखत विनोदी वाटली. तर, अनेकांनी कोरीचं कौतुक केलं. आता पोलीस जेम्सचा शोध घेत आहेत.