JOIN US
मराठी बातम्या / Viral / नकली केसं लावून आला लग्नाला, समोर आले ते सत्य, उडाला एकच गोंधळ, पाहा Video

नकली केसं लावून आला लग्नाला, समोर आले ते सत्य, उडाला एकच गोंधळ, पाहा Video

एका व्यक्तीला दुसरे लग्न चांगलेच महागात पडले आहे.

जाहिरात

वर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कुंदन कुमार, प्रतिनिधी गया, 11 जुलै : बिहारच्या गयामध्ये एका वराला खोटे बोलून पुन्हा लग्न करणे चांगलेच अंगाशी आले. पहिल्या पत्नी असताना दुसरे लग्न लावण्यासाठी आलेल्या वराची माहिती मुलीकडच्या लोकांना मिळाली. यानंतर त्यांन संतापात लग्नाच्या मंचावरच वराला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर, वराला टक्कल पडले होते. तो बनावट केस घालून लग्नासाठी आला होता. शेवटच्या क्षणी लोकांना याचीही माहिती मिळाली. नकली केस घालून लग्नासाठी आलेल्या वराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नासाठी स्टेजवर बसलेल्या वराला लोकांनी आधी ओलीस ठेवले.

यानंतर, एक वयस्कर व्यक्ती तोतया वराला मारहाण करू लागतो. कोणीतरी वराला म्हणाले की, आज तू वाचलास यार, दुसरे गाव असते तर अनेक गोष्टी घडल्या असत्या. या घटनेतील वर हा इक्बाल नगरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या पत्नीसोबत राहत असताना तो दुसरे लग्न करायला रविवारी जिल्ह्यातील डोभी गटातील बाजौरा येथे गेला होता.

दरम्यान यावेळी घडलेल्या प्रकाराने वराने वारंवार माफी मागितली आणि याचना केली. त्यानंतर लोकांनी त्याला ओलीस ठेवले आणि न्हावीला बोलावून केस मुंडवायला सांगितले, पण काही वेळातच वराचे केसही बनावट असल्याचे आढळून आले. या सर्व प्रकाराने याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या