JOIN US
मराठी बातम्या / Viral / छोटं पिल्लू समजून सिंहाच्या छाव्याला गोंजारायला गेला तरुण; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO

छोटं पिल्लू समजून सिंहाच्या छाव्याला गोंजारायला गेला तरुण; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO

कुत्रा-मांजरांच्या डोक्यावरून हात फिरवावे तसा हा तरुण सिंहांच्या छाव्याच्या डोक्यावरून हात फिरवायला गेला.

जाहिरात

सिंहाच्या पिल्लांना गोंजारणं तरुणाला महागात पडलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑक्टोबर : वाघ, सिंह हे जितके खतरनाक तितकीच त्यांची पिल्लं गोड आणि गोंडस दिसतात. ही एवढीशी पिल्लं आपल्याला काय करणार, असंच आपल्याला वाटतं. पण शेवटी पिल्लू असलं तरी ते खतरनाक प्राण्यांचं आहे हे विसरून चालणार नाही. सिंहाचे छोटेसे बछडेही किती खतरनाक ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सिंहाच्या दोन शावकांचा लाड करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओत ही दोन शावके एका गाडीच्या मागच्या भागावर बसलेली दिसत आहेत. व्हिडिओतील प्राणीप्रेमी व्यक्ती या दोन पिल्लांच्या जवळ शांतपणे उभी आहे आणि त्या पिल्लांना हात लावून त्यांचा लाड करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण काहीच सेकंदांत शांतपणे बसलेल्या या पिल्लांपैकी एक पिल्लू आक्रमक झाले. त्यामुळे त्या तरुणाला काही क्षण भीती वाटली व तो पटकन मागे सरकला. हे वाचा -  बापरे! रस्त्यावर आलेल्या वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि…; काय झाला शेवट पाहा VIDEO सुदैवाने यात त्या तरुणाला काही इजा झाली नाही. पण यानंतर देखील त्या तरुणाने शहाणपणा न दाखवता पुन्हा त्या शावकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण ते गाडीच्या छतावर जाऊन बसले. हा व्हिडीओ नेमका कुठे चित्रित झालाय हे अद्याप तरी उजेडात आलेले नाही.  ही व्हिडीओ क्लिप @basit_ayan_2748 या युझरने शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांनी मात्र जंगली प्राण्यांपासून लांबच राहावे आणि असे काही धोकादायक कृत्य करू नये असेच मत मांडले. अनेक युझर्सने कमेंट केली की जंगली प्राणी म्हणजे काही खेळणी नव्हेत! एका व्यक्तीने तर असेही मत मांडले की ,“हा निव्वळ मूर्खपणा आहे.” तर दुसरी व्यक्ती म्हणतेय की , “मी तर थंब्स डाऊनचे ऑप्शन शोधतोय.” या व्हिडिओतील व्यक्तीला बहुतांश नेटिझन्सने असाच सल्ला दिला की, “हे अत्यंत धोकादायक आहे. कृपा करून पुन्हा असे जीवावरील धाडस करू नका. वाघ, सिंह, चित्ता,बिबट्या हे जंगली प्राणी आहेत. हे पाळीव प्राणी नव्हेत”. हे वाचा -  कुत्र्याने वाघाच्या कानाचा घेतला चावा, पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण, पाहा VIDEO अनेकांनी तर व्यक्तीच्या या कृत्याला प्राण्यांचा छळ म्हटलं आहे. माणसाने प्राणीप्रेम दाखवण्यासाठी त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे लाड करण्याचीच गरज नाही. त्यांना मुक्तपणे ,सुरक्षितपणे ,त्यांच्या नैसर्गिक आवासात जगू दिले तरी प्राणीप्रेमाचा उद्देश साध्य होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या