नवी दिल्ली 12 डिसेंबर : आजच्या काळात मेडिकल जगतातही भरपूर सुधारणा झाल्या आहेत. आधीच्या काळात लहान आजारही खूप मोठे वाटायचे. मात्र आता अगदी मोठे आजारही सहज बरे केले जातात. सोशल मीडियावर सध्या दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) अशाच एका व्यक्तीची चर्चा आहे. हा व्यक्ती आपल्या हलगर्जीपणामुळे नपुंसक झाला. यानंतर डॉक्टरांनी एका मृत व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट या व्यक्तीच्या शरीरात सील केला (World’s First Penis Transplant). आता या व्यक्तीने आपला अनुभव शेअर केला आहे. कमाल झाली! बॉस रागावला म्हणून महिलेने चक्क गोदामाला लावली आग, Photos झाली Viral 21 वर्षाच्या या रुग्णाची ओळख गुपित ठेवण्यात आली आहे. मात्र ज्या डॉक्टरने या रुग्णावर उपचार केले, त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या डॉक्टरला लोक आता डॉक्टर डीक या नावाने ओळखू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील संडे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या केसबद्दलची माहिती दिली. डी वॅन डेर मेरव यांनी सांगितलं, की ऑपरेशनच्या माध्यमातून प्रायव्हेट पार्ट जोडल्यानंतर अनेकांनी त्यांना संपर्क साधला. एका व्यक्तीला आपला प्रायव्हेट पार्ट दान करायचा होता. त्यानेदेखील डॉक्टरांना संपर्क साधला. या डॉक्टरने 2014 प्रायव्हेट पार्ट जोडण्याची सर्जरी केली होती. यात एका व्यक्तीचा निकामी प्रायव्हेट पार्ट कापून वेगळा करण्यात आला. यानंतर रुग्णालयातील एका मृत व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापून घेण्यात आला आणि सर्जरीच्या (Private Part Surgery) माध्यमातून तो प्रायव्हेट पार्ट निकामी झालेल्या व्यक्तीच्या शरीरात बसवण्यात आला.
डॉक्टरांनी सांगितलं की सर्जरीनंतर आता या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट सामान्यपणे काम करत आहे. 18 वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट खराब होणं ट्रामापेक्षा कमी नाही. मात्र सर्जरीनंतर आता त्याच्या प्रायव्हेट पार्ट व्यवस्थित काम करत आहे. साउथ आफ्रिकेत पुरुषांचं नपुंसक होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.