JOIN US
मराठी बातम्या / Viral / भरधाव बाईकसोबत फरफटत गेला तरुण आणि...; धडकी भरवणारा VIDEO VIRAL

भरधाव बाईकसोबत फरफटत गेला तरुण आणि...; धडकी भरवणारा VIDEO VIRAL

मोठ्या तोऱ्यात बाईकवर स्टंट मारायला गेलेल्या तरुणाला हिरोगिरी चांगलीच महागात पडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 ऑक्टोबर : बहुतेक तरुणांना बाईक (Bike) चालवायला आवडतं आणि काहींना तर बाईकवर (Bike video) स्टंट करायला. पण बऱ्याचदा हे स्टंट (Bike stunt video) चांगलेच महागात पडतात. अशाच एका बाईक स्टंटचा (Stunt video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात तरुण चालत्या बाईकवर स्टंट करायला गेला पण त्याच बाईकने त्याला फरफटत नेलं (Bike accident video). बाईक स्टंटचा धडकी भकवणारा असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहताच काळजाचा ठोका चुकतो. तरुण मोठ्या तोऱ्यात बाईकवर स्टंट मारायला जातो. पण एका क्षणात त्याची हिरोगिरी बाहेर पडते. नेमकं या व्हिडीओत काय झालं आहे ते तुम्हीच पाहा.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण बाईक चालवतो आहे. बाईकवर तो वेगवेगळ्या करतब दाखवताना दिसतो. सुरुवातीला तो उडवत बाईक चालवतो, त्यानंतर कधी बाईकच्या हँडलवरील हात सोडतो, तर कधी स्वतः सीटवरून किंचितसा उडतो. हे वाचा -  OMG! शीर धडावेगळं झालं तरी टुणटुण उड्या मारतं; बेडकाचा आश्चर्यकारक VIDEO VIRAL पुढे जाऊन तर तो हद्दच करतो. चक्क भरधाव बाईकवरून उडी मारून तो खालीच उतरतो. फक्त बाईकचे हँडल हातात धरून बाईक चालवण्याचा प्रयत्न करतो. जसं तो साधी सायकलच चालवत आहे.  पण बाईक इतकी वेगात आहे की तरुणाचं बाईकवरील नियंत्रण सुटतं. तो करायला जातो एक आणि होतं भलतंच. बाईक त्याला रस्त्यावरून फरफटत नेते. रस्त्यावरील झा़डांमध्ये हा तरुण आपटतो आणि तसाच बाईकसोबत खेचला जातो. पुढे जाऊन तो बाईकसह रस्त्यावर धाडकन कोसळतो. हे वाचा -  झोका खेळतानाच तरुणानं अचानक घेतली उडी अन्…; हा स्टंट VIDEO पाहून व्हाल अवाक या तरुणाचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या हिरोगिरीला दाद द्यावी की मूर्खपणावर हसावं तेच समजत नाही. aw.aw.iq या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या