JOIN US
मराठी बातम्या / Viral / Selfie साठी वंदे भारतमध्ये बसला अन् थेट घरापासून 150 KM दूर पोहोचला, पाहा व्यक्तीसोबत काय झालं..VIDEO

Selfie साठी वंदे भारतमध्ये बसला अन् थेट घरापासून 150 KM दूर पोहोचला, पाहा व्यक्तीसोबत काय झालं..VIDEO

या ट्रेनमध्ये सेल्फी आणि फोटो काढण्याची क्रेझही प्रचंड आहे, त्यामुळे अनेकदा प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे ज्यात सेल्फी काढण्याच्या नादात एक प्रवासी ट्रेनमध्ये अडकला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 जानेवारी : 2019 मध्ये वंदे भारत सुरू झाल्यामुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. त्यामुळेच देशातील प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांमध्ये याची क्रेझ पाहायला मिळत आहे. आधुनिक आणि लक्झरी अनुभव असलेल्या या ट्रेनमध्ये प्रवास करणं हा एक उत्तम अनुभव आहे. ही एक अनोखी ट्रेन आहे जी भारतीय रेल्वेसाठी प्रवास तंत्रज्ञानातील एक नवीन युग दर्शवेल यात शंका नाही. व्हायरल व्हिडीओमुळे जादूगराची पोलखोल, पाहा सामान्य माणसाला असं फसवतात जादूगर या ट्रेनमध्ये सेल्फी आणि फोटो काढण्याची क्रेझही प्रचंड आहे, त्यामुळे अनेकदा प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे ज्यात सेल्फी काढण्याच्या नादात एक प्रवासी ट्रेनमध्ये अडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना आंध्र प्रदेशातील राजमुंद्री स्टेशनची आहे. ट्रेन स्टेशनवर आल्यावर एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी ट्रेनमध्ये चढला. यानंतर पुढच्याच क्षणी ट्रेनचा वेग वाढला आणि ऑटोमॅटिक दरवाजा बंद झाला.

संबंधित बातम्या

यानंतर त्याला ट्रेनमध्येच 150 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. त्याच्याकडून यासाठीचं तिकिटही वसूल केलं गेलं आणि विजयवाडा येथे गाडी थांबल्यावर तो पुन्हा खाली उतरला आणि त्याच्या जीवात जीव आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती चालत्या ट्रेनचं गेट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच दरम्यान तो टीटीला गेट उघडण्याची विनंती करताना दिसत आहे, परंतु तो उलट या व्यक्तीकडूनच भाडं आकारतो आणि तिथे उपस्थित असलेले बाकीचे प्रवासी त्याच्यावर हसताना दिसतात. फॉर्च्यूनरच्या नंबर प्लेटवर ते नाव लिहिणं भोवलं; पोलिसांनी 28 हजार दंड घेत गाडीही केली जप्त दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ म्हणाले की, 16 जानेवारी रोजी एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी राजमुंद्री रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढला आणि ट्रेन विशाखापट्टणमच्या दिशेने जात असताना ही घटना घडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या