JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! हा तर शक्तिमान; लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिलात का?

अरेच्चा! हा तर शक्तिमान; लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिलात का?

ब्रेक डान्स स्विंगवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : आपणा सर्वांना शक्तिमान तर माहितीच आहे. लहानपणी शक्तिमान पाहिल्यानंतर त्याच्यासारखे कपडे घालून गरगर फिरण्याचा प्रयत्नही आपण केला आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शक्तिमानचा (Shaktiman) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो ब्रेक डान्स स्विंगवर (Break Dance Swing) गरगर फिरताना दिसला (Man stand on Break Dance Swing) . ब्रेक डान्स स्विंगवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही व्यक्ती अशा पद्धतीने उभी आहे, जणू काही ती शक्तिमानच आहे. बहुतेक नेटिझन्सनी त्याची तुलना शक्तिमानशी केली आहे. काही जण हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत तर काहींना हसू आवरत नाही आहे.

संबंधित बातम्या

व्हि़डीओत पाहू शकता ब्रेक डान्स स्विंगमध्ये लहान मुलं मजा करताना दिसत आहेत. इतक्यात एका बाजूने फिरत एक व्यक्ती मध्येच येते. या व्यक्तीने आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आहेत. आपला जीव धोक्यात घालून ही व्यक्ती ब्रेक डान्स स्विंगच्या मध्येच उभी राहिली आहे. जणू काही ती शक्तिमान किंवा खतरों की खिलाडीच आहे. हे वाचा -  VIDEO - हंड्यासारखी डोक्यावर ठेवली बाईक, हातांनी न धरताच गाडीवर चढवली या व्हिडीओत या व्यक्तीने जे केलं आहे, त्यापेक्षा आणखी एका गोष्टीने लक्ष वेधलं आहे ते म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव. त्याच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहूनही हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या