JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं नसतं तर विश्वासच बसला नसता; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक

OMG! कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं नसतं तर विश्वासच बसला नसता; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक

एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने जीव वाचवला आहे की सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 एप्रिल : काही घटना अशा असतात ज्या सांगून विश्वास बसत नाही. किंबहुना आपल्या डोळ्यासमोर घडल्या किंवा त्याचा व्हिडीओ पाहिला तरी त्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटिझन्स शॉक झाले आहे. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने जीव वाचवला आहे की सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत (Man saved coworker fall from ladder). तुम्हाला स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्नमॅन असे सुपरहिरो माहितीच आहे. पण एका सामान्य माणसात दडलेला हा सुपरहिरो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याला तुम्ही सुपरहिरो म्हणा, देवदूत म्हणा किंवा एंजल. त्याने जे काम केलं आहे, त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. नेटिझन्स त्याच्यावर फिदाच झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती शिडीजवळ उभी आहे. या व्यक्तीचा साथीदार शिडीवर चढलेला आहे. शिडीजवळ उभी असलेली व्यक्ती काही कामासाठी तिथून थोडी हटते. इतक्यात शिडीवर चढलेल्या व्यक्तीचा पाय घसरतो आणि ती धाडकन खाली कोसळते. हे वाचा -  OMG! …अन् हवेत लटकली चिमुकली लेक, पाहताच हादरला बाप; नेमकं काय घडलं पाहा VIDEO वरून व्यक्ती जमिनीवर कोसळण्याआधीच खाली असलेल्या व्यक्तीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती व्यक्ती शिडीजवळ उभी राहून त्या व्यक्तीला कॅच करते. म्हणजे आपल्यावर झेलते. त्यानंतर दोघंही जमिनीवर आडवे होतात. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर पडते. एकाला वाचवणारी दुसरी व्यक्ती तशीच त्या व्यक्तीसोबत शांत जमिनीवर पडून राहते. जेणेकरून ती व्यक्ती धक्क्यातून बाहेर येईल. त्या व्यक्तीच्या डोक्यावर ती किस करतानाही दिसते. त्याला सर्व ठिक आहे, असा धीर देते.

संबंधित बातम्या

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. goodnews_movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक जण हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. त्यांनी या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. एका युझरने तर जर ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली नसती तर यावर कुणी विश्वासच ठेवला नसता अशी कमेंट केली आहे. हे वाचा -  ब्युटी प्रोडक्टऐवजी ‘त्या’ Men Products च्या जाहिरातीसाठी उतावळी महिला; धक्कादायक आहे कारण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे. हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या