सर्वांना चिरडत गेली कार.
मुंबई, 01 सप्टेंबर : सोशल मीडियावर अपघाताचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी गाडीचालकाच्या तर कधी पादचाऱ्याच्या चुकीमुळे असे अपघात होतात. पण सध्या अशा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात गाडीचालकाने मुद्दामहून पादचारी आणि इतर वाहनचालकांना चिरडलं आहे. अपघाताचा हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धक्का बसेल (Man ride car on people video). तसं रस्त्यावर तुम्ही लोकांना एकमेकांशी वाद घालताना, भांडताना, मारताना, हामाणारी करताना पाहिलं असेल. पण कधी कुणावर मुद्दामहून गाडी चढवत नाही. असं दृश्य आपल्याला फिल्ममध्ये पाहायला मिळतं. जिथं सुडाच्या भावनेतून किंवा एखाद्याची हत्या करण्यासाठी म्हणून गाडीने मुद्दाम अपघात घडवून आणला जातो. एखाद्या फिल्ममधील सीन वाटावा असाच हा धक्कादायक व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता कारचालक गाडी चालवतो आहे. कारमधूनच व्हिडीओ शूट केला जातो आहे. कारच्या समोर एक व्यक्ती असते. जी हातात काही सामान घेऊन चालताना दिसते. आता समोर कुणी आलं तर गाडीचा वेग कमी करणं अपेक्षित असतं, पण या चालकाने मात्र आपल्या गाडीचा वेग वाढवला. त्याने थेट ती गाडी त्या व्यक्तीवर चढवली. रस्त्यावरून चालणारी व्यक्ती हवेतच उडाली. हे वाचा - सुसाट बाईकवर हातापायाची घडी घालून निवांत बसला; 25 सेकंदातच…; धडकी भरवणारा VIDEO इतक्यावरच ही कार थांबली नाही तर त्या व्यक्तीनंतर कारच्या मार्गात जो कुणी आला त्याला ही कार चिरडत गेली. व्यक्तीनंतर सायकल, बाईक आणि स्कूटीला ही कार धडक देते. स्कुटीवरील तरुण जशी पडते तशी ती उठून उभी राहते. तिला मोठा धक्का बसलेला दिसतो.
ज्या शेवटच्या स्कूटीला धडकते त्या स्कूटीवरील मुलगीच ठिक असल्याचं दिसतं आहे. बाकी लोकांचं काय झालं ते माहिती नाही. पण दृश्य पाहता त्यांना नक्कीच गंभीर दुखापत झाली असावी. हे वाचा - VIDEO - गर्दी म्हणून चालत्या बसबाहेर लटकले; 8 सेकंदात जे घडलं ते पाहून धडकी भरेल ViciousVideos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती नाही. पण धडकी भरवणारा आहे.