JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'आई माझ्या बाबांशी लग्न करशील का?', कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO

'आई माझ्या बाबांशी लग्न करशील का?', कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO

प्रपोजचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही सो क्युट म्हणाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : प्रपोज करण्याचे तसे बरेच मार्ग आहेत. कुणी हार्ट सिम्बॉल देऊन, कुणी गुलाब देऊन, कुणी अंगठी देऊन, कुणी एखाद्या रोमँटिक ठिकाणी नेऊन प्रपोज करतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रपोजचा (Proposal Video) असा व्हिडीओ व्हायरल  (Viral Video) होतो आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. प्रपोज करण्याचं ठिकाण आणि पद्धत दोन्हीही हटके आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला पाळण्याजवळ उभी आहे. ती बाळाच्या अंगावरील कपडे बाजूला करताना दिसते आहे. तिच्यासमोर एक पुरुष उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकताही दिसते आहे. महिला जेव्हा बाळाला पाहते तेव्हा थक्कच होते. तिला रडूच कोसळतं. त्यानंतर तिच्यासमोरील तरुण गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करताना दिसतो.

संबंधित बातम्या

त्यानंतर कॅमेरा बाळाजवळ जातो, तिथं पाहू शकता की बाळाला जे कपडे घालण्यात आले आहेत. त्यावर म्हटलं आहे की, आई तू माझ्या बाबांशी लग्न करशील का? हे वाचा -  लग्नाआधी हसतहसत नवरा-नवरीने केलं एकमेकांचं मुंडण; कारण ऐकून आवणार नाही अश्रू असं प्रपोज पाहून महिला भावुक होते. ती आपल्या बॉयफ्रेंडला मिठीच मारते आणि लगेच होकारही देते. आपल्या आई-बाबाला असं एकत्र पाहून बाळाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव दिसून येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या