JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा Video थरकाप उडावणारा! कोणत्याही सेफ्टी शिवाय 23व्या मजल्याच्या छतावरुन Stunt करु लागला व्यक्ती

हा Video थरकाप उडावणारा! कोणत्याही सेफ्टी शिवाय 23व्या मजल्याच्या छतावरुन Stunt करु लागला व्यक्ती

जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ पाहून तुमचा नक्कीच थरकाप उडेल.

जाहिरात

stunt video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 ऑक्टोबर : सोशल मीडियावर नेहमीच आपल्यासमोर असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. तसेच बऱ्याचदा आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपला थरकाप उडवतात. खरंतर तुम्ही हे पाहिलं असेल की, अनेक लोक प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दर्शवतात. यासाठी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. सध्या समोर आलेला व्हिडीओ देखील असाच आहे. जो पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या पोटात गोळा येईल. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आणखी धक्का बसेल. हे ही पाहा : तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला; तरुणासोबत भयंकर घडलं…; पाहा VIDEO या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर उड्या मारताना दिसत आहे. खरंतर हा व्यक्ती एका खिडकीवरुन दुसऱ्या खिडकी वर उडी मारत आहे. ज्यानंतर 4 ते 5 खिडक्यांवरुन उडी मारल्यानंतर ही व्यक्ती शेवटी एका खिडकीतून खोलीच्या आत जाते. सुट बुट घातलेल्या व्यक्तीचं असं कृत्य पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल. खरंतर सुरुवातीला हा व्हिडीओ झूम केलेला आहे, त्यामुळे आधी आपल्याला हे दृश्य तितकंस धोकादायक वाटत नाही, परंतू जेव्हा हा व्हिडीओ झूम आऊट होतो, तेव्हा ही व्यक्ती किती उंचावर हा स्टंट करत असते, हे तुमच्या लक्षात येईल. हे दृश्य पाहून नक्कीच तुमच्या पोटात गोळा येईल. कोणत्याही सेफटी शिवाय ही व्यक्तीचं असा स्टंट करणं हे खरोखरंच मुर्खपणाचं कृत्य आहे. हा व्हिडीओ Erik Ljung नावाच्या फिल्म डायरेक्टरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या व्यक्तीच्या कृत्याबद्दल लिहिलं आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक त्याला लाईक आणि शेअर करत आहेत. अनेक लोक कमेंटमध्ये या व्यक्तीच्या अशा वागण्याला मुर्खपणाचे म्हणत असले, तरी देखीस असे अनेक लोक आहेत, जे या व्यक्तीच्या साहसाचे कौतुक देखील करत आहेत. हे ही पाहा : लग्नानंतर नववधूचं असं कृत्य, आता नवरदेवाला उरली नाही तोंड लपवायला जागा, पाहा VIDEO नक्की काय घडलं? सुट-बुट घातलेली ही व्यक्ती आधी फोनवर बोलत असते, त्यानंतर ही व्यक्ती एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर उडी मारायला लागते. सोसाट्याचा वारा सुरु असताना, कशालाही न जुमानता ही व्यक्ती पुढे जात राहते. शेवटी ही व्यक्ती, इमारतीची एक खिडकी उघडते आणि ती व्यक्ती तिथून आत जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या