छेड काढताच तरुणीने तरुणाला शिकवला धडा.
मुंबई, 23 नोव्हेंबर : महिलांच्या छेडछाडीची कितीतरी प्रकरणं समोर येतात. फक्त रात्रीच नव्हे तर अगदी दिवसाढवळ्याही अशा घटना घडत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिथं एका लिफ्टमध्ये तरुणाने तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने त्याचा तिथंच गेम गेला. छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने अशी अद्दल घडवली की तो आयुष्यात कधीच विसरणार नाही. या तरुणीची काय यापुढे कोणत्याच तरुणीची छेड काढण्याची हिंमत तो करणार नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, लिफ्टमध्ये एक व्यक्ती दिसते आहे. जी मोबाईलमध्ये व्यस्त आहे. जशी लिफ्ट थांबते तशी ती व्यक्ती बाहेर पडते आणि त्याच वेळी एक तरुणी लिफ्टमध्ये जाते. तरुणीला पाहून तो लिफ्टबाहेर आलेला तो तरुण पुन्हा लिफ्टमध्ये जातो. तरुणी मोबाईलमध्ये पाहत असते. तरुण सुरुवातीला तिच्याकडे एकटक पाहत राहतो. तिला खालून वर, मागून पुढून पाहू लागतो. हे वाचा - महिलांना त्रास देणाऱ्यांनो आता सांभाळून राहा; ‘या’ हायटेक सँडलच्या एका फटक्यातच व्हाल गार त्यानंतर तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तरुणी तिथून बाजूला हटते. तरुण पुन्हा तिच्याजवळ जातो. यावेळी तो तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र तरुणीचा संयम सुटतो. ती त्या तरुणाला जोराद कानशिलात लगावते. त्यानंतर त्याला लाथेन मारते. तरुणीच्या मारहाणीत तरुणीची अवस्था भयंकर होते. लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही.
@LockerRoomLOL ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - ‘साहेब, घरचे माझं लग्न करत नाहीत’; अजब तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला तरुण अन् मग… यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.