JOIN US
मराठी बातम्या / Viral / बहिणीच्या लग्नात भावाचा भलताच प्रताप; केकमध्ये मिसळली अशी गोष्ट की सगळेच चक्रावले

बहिणीच्या लग्नात भावाचा भलताच प्रताप; केकमध्ये मिसळली अशी गोष्ट की सगळेच चक्रावले

बेकरला केक बनवण्यासाठी आणि सजवण्यासाठी 20 तास लागले होते. हा सामान्य केकसारखा दिसावा यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि त्यात तो यशस्वीही झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 मार्च : चिलीमधील एका व्यक्तीने भांग घालून बहिणीच्या लग्नाचा केक बनवला (Wedding Cake). हा केक खाल्ल्यानंतर पाहुणे मद्यधुंद झाले. सॅंटियागोच्या 29 वर्षीय अल्वारो रॉड्रिग्जने आपल्या बहिणीसाठी सात थरांचा केक बनवला आणि फक्त एका थरात भांग टाकली. मात्र, या एका थराने आपलं काम केलं आणि लग्नात केक खाणारे सगळे पाहुणे नशेत दिसले. बेकरला केक बनवण्यासाठी आणि सजवण्यासाठी 20 तास लागले होते. हा सामान्य केकसारखा दिसावा यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि त्यात तो यशस्वीही झाला. इतकंच नाही तर हा अतिशय सुंदर वेडिंग केक होता. हा किडा दिसताच पकडून ठेवा; घरबसल्या तुम्हाला बनवेल करोडपती, काय आहे खासियत? चिलीमधील लग्नाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये एक जोडपं केक कापताना दिसत होतं आणि नंतर नशेत पाहुणे नाचताना दिसत होते. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 13 मिलियन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. केकमागील प्रेरणाचे वर्णन करताना, अल्वारोने सांगितलं की पाहुण्यांनी आणि त्याच्या बहिणीने जादुई ब्राउनीज खाल्ले होते, ज्यात भांग होतं आणि त्याचा परिणाम खूप मजेदार होता. बहिणीने तिच्या लग्नाच्या केकमध्ये तिला हीच चव हवी असल्याचं सांगितलं होतं. बहिणीच्या मागणीनंतर त्याबद्दल कोणताही विचार न करता भावाने त्याचं अनुसरण केलं आणि 7 थरांपैकी एका थरात भांग मिसळली. अल्वारोने माध्यमांशी बोलताना सांगितलं की केकची “जादुई” शक्ती सर्व पाहुण्यांना आधीच सांगितली गेली होती. तसंच केकचा तो थर लहान मुलांना दिला जाऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली होती. वय लक्षात घेऊनच पाहुण्यांना हा केक देण्यात आला. तो म्हणाला की सर्वात मजेदार प्रतिक्रिया माझ्या मावशीची होती. चालत्या कारच्या खिडकीतून उडू लागली ‘पापा की परी’; शालेय विद्यार्थीनीचा जीवघेणा स्टंट VIDEO VIRAL अल्वारो म्हणाला, मला आठवतं केक खाण्यापूर्वी ती तिच्या पाठदुखीबद्दल सांगत होती पण केक खाल्ल्यानंतर दोन तासांनी तिचं दुखणं नाहीसं झालं आणि ती एखाद्या तरुणीसारखं नाचत होती. चिली सरकारने 2015 मध्ये भांगचा वापर करणं गुन्हेगारीपासून मुक्त केलं होतं. मात्र याचा केवळ वैयक्तिक (घरी) वापर बेकायदेशीर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या