JOIN US
मराठी बातम्या / Viral / विषारी किंग कोब्राला KISS करायला गेला व्यक्ती; पुढे जे घडलं ते पाहून उडले थरकाप, VIDEO

विषारी किंग कोब्राला KISS करायला गेला व्यक्ती; पुढे जे घडलं ते पाहून उडले थरकाप, VIDEO

जेव्हा सुरुवातीला ब्रायननं साप हातात घेऊन त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा साप आधी भडकला. मात्र, ब्रायन प्रेमानं जवळ घेत असल्याचं आणि त्याच्यापासून काहीही धोका नसल्याचं कदाचित सापाला नंतर जाणवलं असेल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 एप्रिल : जगातल्या सगळ्यांत धोकादायक प्राण्यांमध्ये सापाचा समावेश होतो (Dangerous Snake Video). कुठे सरपटणारा साप दिसला तरी माणसाचा भीतीनं थरकाप उडतो. त्याच्या समोर जाऊन त्याला पकडण्याची हिंमत खूपच कमी जण दाखवतात. काहीजण मात्र सापाला फक्त हातात पकडत नाहीत तर या अत्यंत विषारी प्राण्यावर प्रेमही करतात (Man Kissing Snake Video). असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती सापाला हातात धरून त्याला किस करताना दिसत आहे (Amazing Video). Wedding Video: लग्न पद्धतीला 360 डिग्री फिरवलं; आलेले पाहुणेही हैराण सापाचे व्हिडिओ आणि कंटेट सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय (Daring Video on Social Media) आहे. विशेषत: सापासारखा विषारी प्राणी जर एखादी व्यक्ती आपल्या तोंडाजवळ आणत असेल किंवा त्याचा मुका घेत असेल तर अर्थातच ते बघणाऱ्यांच्या अंगावरही शहारे उभे राहतात. नुकताच एका महिलेनं आपल्या चेहऱ्याजवळ एक दोन तोंडं असलेला साप आणला, हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता. आता एका व्यक्तीनं कोब्रा सापाचा किस घेतल्याचा व्हिडिओ (Man kissing cobra video) व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील व्यक्तीचं नाव आहे ब्रायन बार्कजिक (Braian Barczyk). तो व्यवसायानं एक व्हिडिओ क्रिएटर आहे. त्याला साप आणि अन्य प्राण्यांबरोबर खेळण्याचा आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवण्याचा छंद आहे. या छंदामुळेच एक भल्यामोठ्या आणि विषारी सापाचा किस घेण्याचं चॅलेंज ब्रायननं स्वीकारलं. जेव्हा सुरुवातीला ब्रायननं साप हातात घेऊन त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा साप आधी भडकला. मात्र, ब्रायन प्रेमानं जवळ घेत असल्याचं आणि त्याच्यापासून काहीही धोका नसल्याचं कदाचित सापाला नंतर जाणवलं असेल. त्यामुळे सापानं नंतर काहीही विरोध केला नाही उलट ब्रायनला त्यानं जवळ येऊ दिलं. डॉक्टरांचा करिष्मा! धडधडत्या हृदयातून काढली गोळी, युक्रेनियन सैनिकाचे असे वाचवले प्राण हा व्हिडिओ ब्रायननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट snakebytestv वरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर 14 तासांच्या आतच 10 हजारांपेक्षा जास्त लोकांना तो आवडला आहे. त्यावर लोकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सापाचा किस घेणारी व्यक्ती प्रचंड शूर आणि चांगली असल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. पण काहीजणांनी मात्र त्याला फक्त स्टंट म्हटलंय. सुरक्षेबाबतही काहीजणांनी काळजी व्यक्त केली आहे. तर ब्रायननं घेतलेला पहिला किस सापाला आवडला नाही, अशी मजेशीर प्रतिक्रियाही काहीजणांनी दिली आहे. ब्रायननं हा स्टंट केला; पण त्याला त्याची सवय होती. अर्थातच त्यामध्ये भरपूर धोकाही होता. पण केवळ प्रसिद्धीसाठी कोणताही विचार न करता अशा प्रकारचे व्हिडिओ कृपया तुम्ही तयार करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या