Home /News /videsh /

डॉक्टरांचा करिष्मा! धडधडत्या हृदयातून काढली गोळी, युक्रेनियन सैनिकाचे असे वाचवले प्राण

डॉक्टरांचा करिष्मा! धडधडत्या हृदयातून काढली गोळी, युक्रेनियन सैनिकाचे असे वाचवले प्राण

जवानाचे हृदय धडधडत होते आणि डॉक्टरांनी त्यातून एक गोळीही काढली. आश्‍चर्याची बाब म्हणजे या काळातही हृदय शरीराला समान प्रमाणात रक्तपुरवठा करत होतं.

    नवी दिल्ली, 13 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine war) सुरूच आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या हजारो सैनिकांना या युद्धाचे वाईट परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या एका सैनिकाशी संबंधित बातमीने सर्वांनाच धक्का बसला. या जवानाच्या हृदयाला गोळी लागली होती, मात्र डॉक्टरांच्या पथकाने मिळून या जवानाच्या धडधडणाऱ्या हृदयातून गोळी काढून त्याचे (Doctors remove bullet from beating heart of Ukrainian soldier) प्राण वाचवले. डॉक्टरांच्या या करिष्म्याने सर्वांनाच हैराण केलं आहे. हे प्रकरण वैद्यकीय इतिहासात नक्कीच लक्षात राहील, कारण युक्रेन आणि बेलारूसच्या (Ukraine and Belarusian doctors perform life saving operation) डॉक्टरांनी मिळून अतिशय कठीण ऑपरेशन करून एका तरुणाचा जीव वाचवला. डेली स्टारच्या वृत्तानुसार, रशियाशी लढताना एका सैनिकाच्या छातीत गोळी लागल्यानं त्याला तत्काळ युक्रेनची राजधानी कीव येथील फेओफानिया रुग्णालयात आणण्यात आलं. धडधडणाऱ्या हृदयातून डॉक्टरांनी गोळी काढली या सैनिकाला तातडीनं ओपन हार्ट सर्जरीसाठी नेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, जवानाचे हृदय धडधडत होते आणि डॉक्टरांनी त्यातून एक गोळीही काढली. आश्‍चर्याची बाब म्हणजे या काळातही हृदय शरीराला समान प्रमाणात रक्तपुरवठा करत होतं. या अवघड शस्त्रक्रियेमध्ये युक्रेनसोबतच बेलारूसचे डॉक्टरही सहभागी झाले होते. मोठ्या प्रयत्नातून जवानाच्या छातीतून गोळी काढण्यात आली आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. हे वाचा - Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला तीव्र; शहराच्या शहरं उद्ध्वस्त मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडूनही जवान देशासाठी लढायला तयार त्या जवानाचा डॉक्टरांसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने छातीला चेस्ट सपोर्ट घातला आहे. मृत्यूच्या जबड्यात आल्यानंतरही आपल्या देशासाठी आपण लढण्यास तयार असल्याचं या जवानानं डॉक्टरांना सांगितलं. यानंतरही गंभीर दुखापत झाली मला त्याचे वाईट वाटणार नाही, असेही तो म्हणाला. हॅना ल्युबाकोवा नावाच्या पत्रकाराने ट्विटरवर जवान आणि डॉक्टरांशी संबंधित फोटो शेअर केले आहेत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या