JOIN US
मराठी बातम्या / Viral / ब्रेकअपनंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य; एक्स गर्लफ्रेंडचं अपहरण करत केलं विचित्र काम

ब्रेकअपनंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य; एक्स गर्लफ्रेंडचं अपहरण करत केलं विचित्र काम

एका तरुणाला आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा इतका राग आला की त्याने तिचं थेट अपहरणच केलं (Man Kidnapped Ex Girlfriend). एवढंच नाही तर यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर आपल्या नावाचा टॅटू गोंदवला (Tattoo on Cheek).

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 03 जून : अनेकवेळा कपल आणि त्यांच्या रिलेशनशिपबद्दलची अशी प्रकरणं समोर येतात, ज्याबद्दल जाणूनच सगळे थक्क होतात. कधी-कधी या जोडप्यातील भांडणंही इतकी विचित्र आणि मजेशीर असतात की ती चर्चेचा विषय ठरतात. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. यात एका तरुणाला आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा इतका राग आला की त्याने तिचं थेट अपहरणच केलं (Man Kidnapped Ex Girlfriend). एवढंच नाही तर यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर आपल्या नावाचा टॅटू गोंदवला (Tattoo on Cheek). सासरी जाणाऱ्या लेकीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी ही घटना ब्राझीलमधील एका शहरातील आहे. ‘द सन’ मधील वृत्तानुसार, हे जोडपं बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होतं आणि मागील बराच काळापासून ते एकमेकांवर नाराज होते. याच दरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं आणि दोघं वेगळे झाले. मात्र, काहीवेळा दोघांमध्ये बोलणंही सुरू होतं. अचानक पुन्हा एक दिवस दोघांमध्ये काहीतरी कारणावरुन भांडण झालं.

रिपोर्टनुसार, मुलाचं नाव कोल्हो आणि मुलीचं नाव टायने आहे. दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतर मुलाला कशाचा तरी राग आला आणि त्याने आपल्याच एक्स गर्लफ्रेंडचं अपहरण केलं. त्याने तिला जबरदस्तीने आपल्यासोबत गाडीत बसवलं आणि घरी आणलं. येथे पोहोचल्यानंतर त्याने मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला टॅटू गोंदवून स्वतःचं पूर्ण नाव लिहिलं. VIDEO - World Record साठी 103 वर्षांच्या आजीने आकाशातून मारली उडी आणि असा शेवट झाला की… सध्या या तरुणीचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात तिच्या गालावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेलं दिसत आहे. याप्रकरणी तरुणीच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. तरुणाने स्वतःच्या मर्जीने हा टॅटू गोंदवला असल्याचं तरुणाने म्हटलं आहे. तर हा टॅटू एक्स बॉयफ्रेंडने जबरदस्तीने आपल्या गालावर गोंदवला असल्याची तरुणीची तक्रार होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या