JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणाने सायकलसह उंच डोंगरावरुन मारली उडी अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

तरुणाने सायकलसह उंच डोंगरावरुन मारली उडी अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एक व्यक्ती स्लायडिंगप्रमाणे बनवलेल्या रस्त्यावरुन आपली सायकल घेऊन डोंगरावरुन खाली उडी घेतो. सायकलचं स्पीड खूप जास्त असल्यामुळे हा व्यक्ती आधी हवेतच थोडा वरती जातो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 डिसेंबर : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. काही व्हिडिओ पाहून आपोआपच डोळ्यात पाणी येतं. तर काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात. मात्र, सोशल मीडियावर अनेकांनी विनोदी आणि मजेशीर व्हिडिओच पाहायला आवडतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळून हसवतात. अनेकदा सोशल मीडियावर असेही व्हिडिओ व्हायरल होतात जे धडकी भरवणारे असतात. यात विशेषतः स्टंट व्हिडिओ असतात. सध्या एक असाच स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Stunt Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हेही वाचा -  सुंदर दिसण्याच्या नादात उधळले तब्बल 10 लाख; तरुणीने चेहऱ्याची अक्षरश: लावली वाट व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक उंच डोंगर आणि त्याखाली खोल दरी दिसत आहे. हे दृश्य पाहायला अतिशय भयंकर दिसतं. अशात एक व्यक्ती स्लायडिंगप्रमाणे बनवलेल्या रस्त्यावरुन आपली सायकल घेऊन डोंगरावरुन खाली उडी घेतो. सायकलचं स्पीड खूप जास्त असल्यामुळे हा व्यक्ती आधी हवेतच थोडा वरती जातो आणि यानंतर जमिनीवर कोसळू लागतो. डोंगरावरुन खाली येताच तो आपलं पॅराशूट उघडतो आणि हवेत उडू लागतो.

संबंधित बातम्या

हा अतिशय भयानक स्टंट होता. लहान चुकही यात खूप महाग पडू शकत होती. पॅराशूट उघडण्यात जराही चूक झाली असती तर या व्यक्तीचा जीवही जावू शकत होता. मात्र हे स्टंट प्रोफेशनल व्यक्ती करतात. स्टंट करण्याआधी त्यांनी भरपूर सराव केलेला असतो. जे यात प्रोफेशनल नाहीत अशांना हे स्टंट करण्यास सक्त मनाई केली जाते. कारण यात जीवही जावू शकतो. हेही वाचा -  OMG! स्वतःच्या हातांनी चक्क मगरीलाच भरवायला गेला आणि…; VIDEO पाहूनच धडकी भरेल इन्स्टाग्रामवर हा स्टंट व्हिडिओ shravan_9_9 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 14 मिलियन म्हणजेच 1 कोटी 40 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर 8 लाख 50 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, तुम्हाला हृदय असतं की नाही, आम्ही तर हृदयविकाराच्या झटक्यानेच मरेल. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, हा माणूस वाचला मात्र गाडी गेली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या