ऑस्ट्रेलिया, 21 जून : साप साधा दिसला तरीही अनेकांची भंबेरी उडते. मग अशावेळी शांत राहण तर सोडाच पण त्याठिकाणावरून पळून जाणं अनेक जण पसंत करतात. अशावेळी विचार करा तुमच्या घराच्या सिंकमध्ये साप आढळून आला तोही ‘भलामोठा डायमंड पायथॉन’ (Giant Diamond Python) तर एखाद्याची काय अवस्था होईल? आरडाओरड करुन एखादा माणूस घर डोक्यावर घेईल. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एवढा मोठा पायथॉन पाहूनही हा माणूस शांत आहे. ऑस्ट्रेलियामधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका व्यक्तीच्या घरामध्ये असणाऱ्या सिंकमध्ये भलामोठा डायमंड पायथॉन नावाचा साप आढळून येतो. तर हा माणूस शांतपणे त्या सापाला उचलतो आणि त्याला एका पिशवीमध्ये टाकतो. (हे वाचा- भररस्त्यात कोब्राने केली उलटी; पोटातून जे बाहेर पडलं VIDEO पाहून थक्क व्हाल) सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल, पण या व्हिडीओतील माणसाच्या Chill प्रतिक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ट्विटरवर एबीसी न्यूजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला असं कॅप्शन दिलं आहे, ‘पाहा ऑस्ट्रेलियातील एका रहिवाशाच्या घराच्या सिंकमधील साप हा माणूस किती शांतपणे बाहेर काढतो’.
आतापर्यंत हा व्हिडीओ 63 हजारापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 800 लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. यावर कमेंट करताना अनेकांना या माणसाच्या शांत प्रवृत्तीचं कौतुक केलं आहे. काहींनी मजेदार कमेंट केल्या आहेत, तर एका युजरने म्हटलं आहे की हा व्हिडीओ पाहून मला नाही वाटत मी ऑस्ट्रेलियामध्ये कधी जाईन.
अशाप्रकारे साप पकडणं धोक्याचं ठरू शकतं हे देखील वाचकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.