JOIN US
मराठी बातम्या / Viral / Ajab Gajab : बिअर आणि स्नॅक्ससाठी रेस्टॉरंटने आकारले इतके रुपये, बिल पाहून व्यक्ती शॉक

Ajab Gajab : बिअर आणि स्नॅक्ससाठी रेस्टॉरंटने आकारले इतके रुपये, बिल पाहून व्यक्ती शॉक

नुकतंच एक ब्रिटिश कुटुंब ग्रीक आयलंड मायकोनोस इथे सुट्टी घालवण्यासाठी गेलं होतं. तिथे त्यांनी बीचवर खूप मजा केली, परंतु ते जेवायला गेल्यावर त्यांची मोठी फसवणूक झाली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून : आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो की जेवण ऑर्डर करताना त्याची किंमत बघतो. पण, रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाला बिल पाहून धक्का बसला. काही ड्रिंक्स आणि स्नॅक्ससाठी एवढं मोठं बिल कसं येऊ शकतं, या विचारात ते पडलं. त्या व्यक्तीने बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून रेस्टॉरंटवर लूट केल्याचा आरोप केला आहे. त्याच्या पोस्टवर युजर्सनी विविध कमेंट्स केल्या आहेत. नुकतंच एक ब्रिटिश कुटुंब ग्रीक आयलंड मायकोनोस इथे सुट्टी घालवण्यासाठी गेलं होतं. तिथे त्यांनी बीचवर खूप मजा केली, परंतु ते जेवायला गेल्यावर त्यांची मोठी फसवणूक झाली. कुटुंबातील एका सदस्याने रेडिटवर बिल पोस्ट केलं. ज्यामध्ये रेस्टॉरं मिल्कशेक, एक ग्रीक सॅलेड, ब्रेड आणि कॅलमारी ऑर्डर केले होते. एवढ्या खाण्यासाठी रेस्टॉरंटने थोडथोडके नव्हे तर तब्बल 36 हजार 80 रुपये बिल आकारले. त्या व्यक्तीने रेस्टॉरंटचे बिलही पोस्टसोबत शेअर केले आहे. टने अगदी थोड्याशा जेवणाचं भलंमोठं बिल आकारलं. त्यांनी जेवणासाठी 5-6 पदार्थ मागवले, त्याचे त्यांना 309 पाउंड (सुमारे 36,000 रुपये) बिल भरावं लागलं. 36000 रुपये बिल पाहून सगळेच चक्रावले त्या कुटुंबातील एका व्यक्तीने रेडिटवर बिल शेअर करत घडलेला घटनाक्रम सांगितला. तो युजर म्हणाला, एका दुपारी तो कुटुंबाबरोबर मायकोनोसच्या प्लॅटिस गियालोस बीचवरील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे त्यांनी एक बिअर, एक मोजिटो, दोन तो रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांना बिलाबद्दल विचारत राहिला, पण तो आमच्याकडे दुर्लक्ष करत राहिला, असा दावा त्याने केला आहे. सुरुवातीला सॅलेड आणि स्नॅक्सला चार्जेबल म्हटलं नव्हतं, पण नंतर त्याचेही पैसे त्यांनी त्यात जोडले. त्यांनी रेस्टॉरंटकडे तक्रार केली पण तक्रारीचा काही उपयोग झाला नाही आणि त्यांना संपूर्ण बिल भरावं लागलं. व्यक्तीच्या पोस्टवर एका रेडिट युजरने कमेंट केली की ‘मेनू (कार्ड) पाहायला पाहिजे होतं.’ दुसर्‍याने लिहिलं की पर्यटनस्थळी वस्तू महाग असतात. तिसरा म्हणाला, ‘त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे होते ही चांगली गोष्ट आहे’. ‘रेस्टॉरंट महाग असेल’, असं आणखी एका युजरने म्हटलंय. असा अनुभव तुम्हाला भारतातही आला असू शकतो, पण रेस्टॉरंट मालक ग्राहकाला दाद देत नाहीत हा जागतिक अनुभव आहे असं म्हणावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या