JOIN US
मराठी बातम्या / Viral / डॉक्टर बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली तरुणी; कुटुंबीयांसमोरच त्याने केलेली मागणी ऐकून झाली शॉक

डॉक्टर बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली तरुणी; कुटुंबीयांसमोरच त्याने केलेली मागणी ऐकून झाली शॉक

तिच्या बॉयफ्रेंडचं नाव जस्टिन आहे आणि ती त्याच्या एका अॅटिट्यूडवर खूप नाराज आहे. महिलेनं सांगितलं की तिचा प्रियकर व्यवसायाने एक डॉक्टर आहे आणि त्याला फक्त बाहेरच नाही तर घरातल्या लोकांनीही त्याच्या नावासोबत डॉक्टर म्हणावं अशी इच्छा आहे

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 30 एप्रिल : प्रोफेसर, डॉक्टर, सीए, इंजिनीअर किंवा पीएचडीची पदवी घेतलेले लोक त्यांच्या नावासमोर पदव्या लावण्याबाबत खूप संवेदनशील होतात. तुम्ही अनेकदा अशा लोकांना रागवताना पाहिलं असेल, जेव्हा कोणी त्यांच्या नावासमोर त्यांची पदवी लावत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पदवीसाठी खूप मेहनत केली आहे आणि प्रत्येकाने त्यांचा आदर केला पाहिजे. परंतु घरामध्येही त्यांना तेच हवं असेल तर समस्या उद्भवतात. अलीकडेच एका महिलेनं सोशल मीडिया साइट Reddit (Reddit weird news) वर याच गोष्टीशी संबंधित एक घटना शेअर केली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिचं नाव न सांगता तिनं सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव जस्टिन आहे आणि ती त्याच्या एका अॅटिट्यूडवर खूप नाराज आहे. महिलेनं सांगितलं की तिचा प्रियकर व्यवसायाने एक डॉक्टर आहे आणि त्याला फक्त बाहेरच नाही तर घरातल्या लोकांनीही त्याच्या नावासोबत डॉक्टर म्हणावं अशी इच्छा आहे (Man angry as girlfriend’s family not calling him doctor). पतीनं अचानक घटस्फोट दिल्यानं डिप्रेशनमध्ये गेली; अनेक वर्षांनी सोबतचे फोटो बघताना समजलं धक्कादायक कारण एकदा ती महिला जस्टिनला तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तिच्या घरी घेऊन गेली, जिथे सगळे त्याला जस्टिन म्हणत होते. रिलेशनशिपमध्ये येऊन 8 महिने झाले होते आणि महिलेला असं वाटलं की जेव्हा एखाद्याशी वैयक्तिकरित्या बोलणं होतं, तेव्हा आपण त्याचं थेट नावच घेतो. मात्र तिच्या प्रियकराला ही गोष्ट आवडली नाही. जस्टिनने नंतर महिलेला सांगितलं की त्याला वाईट वाटलं की तिच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टर जस्टिन न म्हणता फक्त जस्टिन म्हटलं. बराच काळ त्याचा हा राग कायम होता. हळूहळू या गोष्टीवरून जस्टिन चिडू लागला. यानंतर पुन्हा एकदा तिचा प्रियकर तिच्या घरी गेला, मात्र तेव्हाही असाच प्रकार घडला. यावेळी त्याने गर्लफ्रेंडच्या वडिलांना थांबवलं आणि नंतर त्यांच्यासोबत भांडण केलं. यानंतर तो प्रेयसीसोबत बाहेर आला आणि मला अपमानित करण्याचा अधिकार तू त्यांना दिला असल्याचं म्हणत तो तिच्यावर ओरडू लागला. एअरपोर्टवर BF ने केलं ब्रेकअप, तरुणीने विमान हलवून टाकलं; शेवटी एअरलाइन्सने… आता प्रियकर महिलेशी बोलत नसल्याने तिला या गोष्टीची काळजी वाटत आहे. तिने सोशल मीडियावर लोकांचं मत जाणून घेतलं, मात्र सर्वांनी तिला पाठिंबा देत जस्टिनला ताबडतोब सोडण्याचा सल्ला तिला दिला. लोक म्हणाले की डॉक्टर हा त्याच्या कामाचा एक भाग आहे, त्यामुळे जो कोणी त्याला व्यावसायिक स्तरावर भेटेल, तो फक्त डॉक्टरच बोलू शकतो. परंतु घरातील लोक त्याला जस्टिनच म्हणतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या